Nashik Crime News : गेल्या आठवडाभरामध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये चोरीच्या दोन घटनांपाठोपाठ भाभानगरमध्ये ७ लाखांच्या घरफोडीसह दोन घरफोड्या आणि मोबाईल हिसकावून नेण्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
यातून सुमारे ९ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे तर दुसरीकडे बाहेरगावी जाणाऱ्यासमोर आपल्या बंद घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्ती वाढविण्याची मागणी होते आहे. (9 and half lakh stolen in last week in nashik crime news)
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दिवाळीपासून चोऱ्या, घरफोडीच्या घटना वाढल्या असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आठवडाभरात चोरीच्या दोन, घरफोड्या दोन आणि जबरी चोरीच्या दोन अशा सहा घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल ९ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घरातून दागिने चोरीला
शिलापूर परिसरातील महाले मळ्यातील घरातून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेले. अरुण किसन महाले यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.१५) मध्यरात्री सदरील चोरीची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, आर्टिलरी सेंटरमधील पी-४ बॅरेकमधील लॉकर तोडून अज्ञात चोरट्याने त्यातील ५४ हजार रुपयांचे २६ मोबाईल चोरून नेले आहेत. याप्रकरणी सुरेंद्रकुमार पवनकुमार शर्मा (रा. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.१५) सकाळी दहाच्या सुमारास सदरील प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाभानगरला ७ लाखांची घरफोडी
भाभानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून चांदीचे दागिने व रोकड असा ७ लाखांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. कमलेश शांताराम गीते (रा. सप्तश्रृंगी अपार्टमेंट, भाभानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.१६) दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, विजय अशोक शिंपी (रा. शुभम पार्क, उत्तमनगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता.१३) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे लॉक तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईल हिसकावले
सातपूर परिसरातील श्रीराम चौकात मोपेडवरून आलेल्या दोघांनी एकाच्या हातातील १६ हजार ५०० रुपयांचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून नेला. स्नेहल गोपाळ येळमल्ले (रा. समृद्धी सर्कल, सुला सर्कल, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता.१३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सदरचा प्रकार घडला.
याप्रकरणी सातपूर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, केशव शिवाजी वानखेडे (रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ११ तारखेला सकाली आठच्या सुमारास वानखेडे हे पाथर्डी -वडनेर रोडवरील हॉटेल रायबाजवळ असताना अज्ञात संशयिताने त्यांच्या हातातील ७ हजार रुपयांचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून नेला. यप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.