सटाणा (जि. नाशिक) : रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सटाणा शहरातील एका होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुणाला तब्बल नऊ लाख रुपयांना फसविल्याबद्दल वडील, मुलगा व सुनेला सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. एक संशयित फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (9 lakhs rupees fraud with young man under railway job Nashik Fraud Crime Latest Marathi News)
सटाणा शहरातील सुभाष रोड क्रमांक ४ येथे वास्त्यव्यास असलेल्या अनिल पोपट सोनवणे या सुशिक्षित बेरोजगार तरुणास शुक्राचार्य आबाजी साळुंखे, संदीप शुक्राचार्य साळुंखे, प्रियंका संदीप साळुंके व नितीन बारापते (रा. कराड, जि. सातारा) यांनी रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले आणि २०१८ मध्ये संगनमताने सोनवणे यांच्याकडून बँकेमार्फत नऊ लाख रुपये घेतले होते.
त्या मोबदल्यात रेल्वेचा नोकरीचा अर्ज भरून वैद्यकीय तपासणी दाखले व इतर कागदपत्र घेतली होती. वर्ष उलटूनही नोकरीचे आदेश न आल्याने पैसे देणाऱ्यांकडे सोनवणे यांनी वारंवार विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी सटाणा पोलिसांत तक्रार दिली.
तक्रारीची तत्काल दखल घेत सटाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब निरभवणे यांच्या पथकाने सापळा रचून कराड तालुक्यातील वराडे येथून शुक्राचार्य आबाजी साळुंखे, संदीप शुक्राचार्य साळुंखे, प्रियंका संदीप साळुंके यांना अटक केली. तर नितीन बारापते अद्याप फरारी असून, सटाणा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.