Nashik News: एकवीरा माता मंदिरात 9 मीटर उंचीची दीपमाळ! दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघण्यास मदत

A nine meter tall Deepmala built in Ekvira Mata Temple at Nandgaon.
A nine meter tall Deepmala built in Ekvira Mata Temple at Nandgaon.esakal
Updated on

Nashik News : शहराची ग्रामदेवता असलेल्या एकवीरा देवीच्या मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतून कायापालट होत असून त्यात मंदिर परिसराचे सुशोभीकरणाच्या काम जोरात सुरु आहे.

याच कामांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या दगडी दीपमाळेने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या नऊ मीटर उंचीची या दीपमाळेतल्या शंभरहून अधिक पारंपरिक दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघण्यास मदत होणार आहे.

शांत, सौम्य अशा उजेडाने सारा मंदिर परिसरातील प्रसन्नता राखण्यास हातभार लागणार आहे. (9 meter high Deepmal in Ekvira Mata Temple Lamps help to illuminate temple premises Nashik News)

मागील वर्षी आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शहराची ग्रामदेवता असलेल्या एकवीरा देवीच्या पुरातन मंदिर व परिसराच्या सुशोभीकरणासाठी मान्यता मिळाली होती.

त्यासाठी ५० लाखाचा निधी प्राप्त झाला त्यातून आता मंदिर विकासाची कामे करण्यात येत आहे. या कामांतर्गत दीपमाळ व गणेश मंदिर उभारणीच्या कामाला गती मिळालेली आहे.

मंदिराच्या आतील बाजूने प्रायमर कोर्ट करून रंगरंगोटी करणे, प्रवेश कमान व मंदिरासाठी रंगरंगोटी करणे, फ्लोरींग करता १५० एमएम जाडीचे सोलिंग करणे, मंदिर परिसरात ग्रॅनाईट फ्लोरिंग करणे इतर आनुषंगिक कामांच्या बाबीचा समावेश या विकासकामात करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A nine meter tall Deepmala built in Ekvira Mata Temple at Nandgaon.
Tomato Crop: बागलाणमध्ये गावोगावी निषेधाचे बॅनर; शेतकरी संघटनेकडून नाफेडतर्फे टोमॅटो खरेदीचा निषेध अन टीकाही

शंभर दिवे लावण्याची व्यवस्था

दीपमाळेचा चौथरा आणि त्यावर निमुळता होत जाणारा नऊ मीटर उंचीचा दगडी स्तंभ आहे. त्याच्यात खोबणी करून त्यामध्ये दिवे ठेवण्याची व्यवस्था अशी रचना या दीपमाळेची असून त्यात शंभर दिवे ठेवण्याची व्यवस्था आहे.

दीपमाळेच्या सर्वात वर नक्षीदार गोल खोलगट भाग असून ज्यात तेलात भिजवलेली मोठी त्रिपुरा वात अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या दीपमाळेला खेटून समोर गणपती दगडी बांधकामातील देखणे सुबक मंदिर असेल. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दीपमाळ लक्ष वेधून घेत आहे .

A nine meter tall Deepmala built in Ekvira Mata Temple at Nandgaon.
Nandurbar News: वैयक्तिक लाभ योजनेचे अडले घोडे! धडगावात योजनेस 7 वर्षांपासून उशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.