Monsoon Update News
Monsoon Update Newssakal

Monsoon Update : राज्यात गेल्यावर्षीपेक्षा 9 टक्के अधिक पाऊस

Published on

नाशिक : राज्यात या महिन्यात सर्वदूर वरुणराजा (Rain) हजेरी लावत असल्याने गेल्यावर्षीपेक्षा आज सकाळपर्यंत ९ टक्क्यांनी अधिक म्हणजेच, १२४.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ही जरी स्थिती असली, तरीही शंभर टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ९६.२ टक्के सातारा, ९३.२ टक्के जळगाव, ९१.७ टक्के सांगली, ८१.६ टक्के धुळे, तर ७०.२ टक्के पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झाला आहे. पावसाच्या सातत्यामुळे खरीपाच्या (kharif) राज्यातील पेरण्या ७१ टक्के क्षेत्रावर उरकल्या आहेत. (9 percent more rainfall in state than last year Nashik latest Marathi News)

खरीपामध्ये सर्वाधिक म्हणजे ९८ टक्के पेरण्या सोयाबीनच्या झाल्या असून त्याखालोखाल कापसाची लागवड ८५, तुरीची लागवड ७० आणि उडीद पेरणी ६२ टक्के क्षेत्रावर झाली आहे. राज्यातील सर्वसाधारण १ कोटी ४१ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १ कोटी १ लाख १२ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

पीकनिहाय पेरणीच्या क्षेत्राची टक्केवारी अशी : भात-२२. ज्वारी-१९, बाजरी-३४, नागली-९, मूग-४२, तीळ-१६, खुरासणी-१०, भुईमूग-५१. या आठवड्यात पाऊस होत असल्याने पश्‍चिम पट्यात भाताच्या लागवडीला वेग आल्याने येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये भाताच्या लागवडी पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२५ तालुक्यात स्थिती नाजूक

राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी ६० तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के, तर २७० तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित २५ तालुक्यातील पावसाच्या हजेरीची स्थिती नाजूक आहे.

त्यापैकी जळगाव जामोद (जि. बुलडाणा) तालुक्यात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. याशिवाय इगतपुरी (जि. नाशिक), नंदूरबार, शहादा, तळोदा (जि. नंदूरबार), धरणगाव, बोधवड, भुसावळ, यावल, रावेर (जि. जळगाव), सांगोला (जि. सोलापूर), महाबळेश्‍वर, कोरेगाव (जि. सातारा), कडेगाव (जि. सांगली), आजरा, चंदगड, शिरोळ, राधानगरी (जि. कोल्हापूर), आष्टी (जि. बीड), मलकापूर, संग्रामपूर (जि. बुलडाणा), अकोट (जि. अकोला), अचलपूर (जि. अमरावती), मौधा (जि. नागपूर), धानोरा (जि. गडचिरोली) या २४ तालुक्यात ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.

दरम्यान, या महिन्यात राज्यात दिवसनिहाय झालेला सरासरी पाऊस मिलीमीटरमध्ये असा : १ जुलै-१३.६, २ जुलै-९.६, ३ जुलै-७.८, ४ जुलै-१२.७, ५ जुलै-३३.१, ६ जुलै-२१.५, ७ जुलै-१८.१, ८ जुलै-२०.१, ९ जुलै-२४.३, १० जुलै-२८.२, ११ जुलै-२१.५, १२ जुलै-२९.२, १३ जुलै (सकाळी संपलेल्या चोवीस तासापर्यंत)-४१.९. या महिन्याच्या तेरा दिवसांमध्ये महिन्याच्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत राज्यात ८५.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Monsoon Update News
Nashik Rain Update : जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

विभागनिहाय पावसाची स्थिती

(आकडे टक्क्यांमध्ये दर्शवितात)

विभागाचे नाव आज सकाळपर्यंतचा पाऊस गेल्यावर्षीचा पाऊस

कोकण ११६.५ ११४.४

नाशिक ११७.६ ७३.५

पुणे ८७.६ ८७.६

औरंगाबाद १५८.८ १४७.८

अमरावती १२०.२ ११८.२

नागपूर १४१.२ १०९.८

२१ जिल्ह्यात १३ दिवसांपेक्षा कमी पाऊस

राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये या महिन्यातील १३ दिवसांपेक्षा कमी दिवस पाऊस झाला आहे. जिल्हानिहाय झालेल्या पावसाचे दिवस

असे : सोलापूर-६. नगर, बीड-८. जळगाव, बुलडाणा-९. धुळे, सांगली, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी-१०. नंदूरबार, नाशिक, जालना, लातूर, अकोला, वाशीम-११. हिंगोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली-१२.

Monsoon Update News
Sports Update : मनमाडच्या शिरपेचात अजून मानाचा तुरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()