बँकांच्या आडमुठेपणामुळे लाभाची रक्कम मिळाली महिनाभरानंतर

bank
bankGoogle
Updated on
Summary

तालुक्यात संजय गांधी, श्रावणबाळ वृद्धापकाळ, दिव्यांग व विधवा अर्थसहाय्य या योजनेंचे ३० हजार लाभार्थी आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये लाभाची रक्कम (अनुदान) मिळते.

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यात संजय गांधी, श्रावणबाळ वृद्धापकाळ, दिव्यांग व विधवा अर्थसहाय्य या योजनेंचे ३० हजार लाभार्थी आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये लाभाची रक्कम (अनुदान) मिळते. तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या वडनेर, करंजगव्हाण व कळवाडी येथील शाखांना धनादेशऐवजी ऑनलाइन रक्कम टाकावी, अशी मागणी करत धनादेश नाकारले होते. बँकांच्या या आडमुठेपणाचा तब्बल नऊ हजार लाभार्थ्यांना फटका बसला होता. अखेर एक महिन्यानंतर या लाभार्थ्यांना हे अनुदान प्राप्त झाले. (9 thousand beneficiaries got the benefit of the government scheme after one month)

महसूल विभागाने नियमानुसार एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांची यादी व धनादेश बँकांकडे पाठविले. मात्र ऑनलाइन रक्कम टाकण्याच्या मागणीमुळे महसूल विभागाची अडचण झाली. लाभार्थी बँकेत चकरा मारून थकले. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी बँकांशी पत्रव्यवहार करून शासन नियमांची माहिती देत धनादेश स्वीकारण्याची अपेक्षा व्यक्त केली. दाद न मिळाल्याने तब्बल ९० लाख रुपये महिनाभर पडून होते. अखेर कारवाईचा इशारा देण्यात आला. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महसूल विभागाने हा विषय मांडला. यानंतर बँकांनी धनादेश स्वीकारून रक्कम लाभार्थ्यांच्या नावावर वर्ग केली. नऊ हजार लाभार्थ्यांना महिन्यानंतर लाभ मिळाला. अडचणीच्या काळात मात्र त्यांना अनुदानाची प्रतिक्षा करावी लागली.

bank
'सारथी'तून शाहु महाराजांचे नाव काढा; संभाजीराजे कडाडले!

तहसीलदारांकडे तक्रार

कळवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कामकाजासंदर्भात सरपंच भुराबाई माळी, उपसरपंच यशवंत भोसले यांनी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्याकडे तक्रार केली आहे. या बँकेत खातेदारांना शासकीय अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नाही. अनुदानाची रक्कम प्राप्त होऊनही ती परत पाठविली जाते. लाभार्थी बँकेत चकरा मारुन त्रस्त होतात. महसूल विभागाने व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज द्यावी. बँकेच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

(9 thousand beneficiaries got the benefit of the government scheme after one month)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.