नाशिक : तीस वर्ष सेवा केलेल्यांना आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector of Police) पदावरील कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालयातील विविध आस्थापना, पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत ९० सहायक पोलिस उपनिरीक्षकांना (जमादार) पोलिस उपनिरीक्षकपदी (फौजदार) बढती मिळाली आहे. आयुक्त जयंत नाईकनवरे (Police commissioner) यांच्या आदेशामुळे बढती मिळालेल्या फौजदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (90 Assistant Sub Inspector of Police in police Commissionerate became Police sub insector nashik news)
शहर पोलिस आयुक्तालयातील विविध ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आदींमध्ये कार्यरत ९० सहायक उपनिरीक्षकांना उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेतील दत्तात्रेय कडनोर, विशेष शाखेतील नंदू देशमुख, संजय जाधव, अनिल भालेराव, राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील गोकुळ आवारे, मनुरुद्दीन शेख, दंगल नियंत्रण पथकातील दिलीप भारते, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रदीप धात्रक यांच्यासह पंचवटी, अंबड, भद्रकाली, नाशिक रोड, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, सरकारवाडा, उपनगर, गंगापूर पोलिस ठाणे, पोलिस नियंत्रण कक्ष, मुख्यालय, अभियोग कक्ष, वाहतूक शाखा, मोटार परिवहन, नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
तोपर्यंत तीच कर्तव्य...
बढतीची ग्रेड मिळालेल्या उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळेपर्यंत ते सहायक उपनिरीक्षकांचीच कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडतील. मात्र, गणवेशात अतिरिक्त एक स्टार, गणवेश उपनिरीक्षकांसारखाच राहील. श्रेणी उपनिरीक्षकांसाठी रिबन असेल. यातील कोणाविरुद्ध गुन्हा दाखल असेल, निलंबनाची कारवाई आदी माहिती त्यांना सादर करावी लागेल. श्रेणी उपनिरीक्षक संबोधून नोंद स्टेशन डायरीमध्ये घ्यावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.