नाशिक : शहर व जिल्ह्यातील मृतांच्या नोंदी पोर्टलवर नोंदण्याबाबत संथपणा अजूनही कायम आहे. अजूनही नऊशेहून अधिक मृत्यूंच्या नोंदी बाकी आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मृत्यू नोंदणी त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला पत्र दिले आहे. (900 deaths not reported on portal in Nashik district)
नोंदी न झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक
गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या साप्ताहिक कोरोना (Corona Virus) आढावा बैठकीत, ५२२ नोंदी बाकी असल्याची माहिती दिली गेली होती. मात्र खासगी रुग्णालयांकडून अजूनही माहितीच भरलेली नसल्याचे पुढे येते आहे. त्यामुळे अजूनही नऊशेहून अधिक मृत्यूंच्या नोंदी झालेल्याच नाहीत. कामाच्या ताणामुळे पोर्टल अपडेट होत नसल्याबाबतच्या या तक्रारी होत्या. मृत्यूच्या नोंदी लपविण्यातून हा प्रकार नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. आजच्या पालक सचिवांच्या बैठकीत हा मुद्दा पुढे आला. त्यातही खासगी रुग्णालयांकडून प्रतिसाद कमी आहे. त्यात नाशिक शहरातील नोंदी न झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक आहे.
मृत्युदरातील नोंदीमुळे परिणाम नाही
मृत्यूंच्या अपडेट नोंदीमुळे नाशिक जिल्ह्याचा मृत्युदरातील क्रमांक फार वर-खाली होणार नाही. उलट अधिक खाली कमी मृत्यू झाल्याचेच पुढे येईल. केवळ नाशिकच नव्हे तर राज्यभरातील साधारण सगळ्याच जिल्ह्यातील मिळून सुमारे ४० हजारांवर मृत्यूंच्या नोंदी करण्यास यंत्रणेकडून दिरंगाई झाली आहे. त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील यंत्रणेवर मृत्यूचे आकडे लपविण्याचा आरोप गैरलागू असल्याचे जिल्हा यंत्रणेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
(900 deaths not reported on portal in Nashik district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.