Nashik : वीजखंडितच्या नावाने 90 हजारांना गंडा

Fraud cyber crime latest news
Fraud cyber crime latest newsesakal
Updated on

नाशिक : बिल भरा, अन्यथा वीजजोडणी खंडित (Power Cut) केली जाईल, असा मेसेज पाठवून ग्राहकांना संपर्क क्रमांक व लिंक पाठवून नागरिकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये ऑनलाइन वर्ग करून गंडा (Fraud) घातला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत.

नागरिकांनी सावधगिरी बाळगून अशा कोणत्याही मेसेज वा फोनवर आपली माहिती न देण्याचे आणि लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. दरम्यान, अशाच प्रकारातून एकाला ९० हजारांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (90000 rs fraud under name of power outage nashik crime latest news)

‘तुमच्या घराचा वीजपुरवठा आज रात्री बाराला खंडित होणार आहे. तातडीने तुम्ही आमच्या इलेक्ट्रिसिटी ऑफिसच्या या नंबरवर संपर्क साधा’ असे बनावट मेसेज वीजग्राहकांना भामट्यांकडून पाठविले जात आहेत. महावितरणने आवाहन करून आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल करूनही वीजग्राहकांना असे मेसेज येण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.

वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे, त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा ॲप डाउनलोड करण्यास सांगणे, याला वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Fraud cyber crime latest news
Corona Update : जिल्ह्यात 80 पॉझिटिव्‍ह, 58 रुग्‍ण कोरोनामुक्‍त

नव्वद हजारांना गंडा

मुंबई नाका पोलिसांत रविकांत काळे (रा. वेळजी भीमजी बिल्डिंग २, बाजार स्ट्रीट, फोर्ट, मुंबई) २२ मेस त्र्यंबकेश्‍वर येथून नाशिक रोड रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी बसने निघाले होते. द्वारका चौक येथे त्यांची बस आली असता, त्यांच्या मोबाईलवर बेस्ट इलेक्ट्रिसिटीद्वारे वीजजोडणी खंडित करणार असल्याचा मेसेज आला. त्यांना 6295841228 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. काळे यांनी संपर्क केला असता संशयिताने दीपक शर्मा असे नाव सांगून काळे यांना मोबाईलवर ‘टीम व्ह्यूव्हर क्विक सपोर्ट’ हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.

ॲप ॲक्टिव्हेट करण्याकरिता दहा रुपयांचे बिल पेमेंट करायला सांगून क्रेडिटकार्ड नंबरचा वापर करून ॲपमध्ये विचारणा केलेली माहिती भरायला लावली. हे पेमेंट केले असता काळे यांच्या बँक खात्यातून ९० हजार ३३८ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यामार्फत नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud cyber crime latest news
Unity in Diversity : जय हरी विठ्ठल, अल्लाहू अकबर स्वरांनी शहर निनादले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.