९३ वर्षांच्या योद्धयाचा कोरोनावर विजय! निराशेच्या वातावरणात सकारात्मकतेची पेरणी

जगभरात सुरु असलेल्या जीवघेण्या कोरोनावर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९३ वर्षांच्या प्रल्हाद पाटील - कराड यांनी मात केली आहे.
Pralhad Patil
Pralhad Patil
Updated on

निफाड (जि. नाशिक) : जगभरात सुरु असलेल्या जीवघेण्या कोरोनावर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९३ वर्षांच्या प्रल्हाद पाटील - कराड यांनी मात केली आहे. ‘दादा’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या प्रल्हाद पाटील यांना डायबेटीस, ब्लडप्रेशर, मणक्याचा आजार असूनही त्यांनी आत्मविश्‍वासाने कोरोनाशी दोन हात करत नकारात्मकतेच्या वातावरणात कोरोनाचा पराभव करीत सकारात्मकतेची साखर पेरणीच केली आहे.

प्रल्हाद पाटील - कराड हे ज्येष्ठ नेते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेले लोकनेते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. काही काळाने दादांच्या जिभेची चव गेली व चक्कर येण्यासह इतर संबंधित लक्षणे दिसून आली. चाचणीअंती कोरोनाचे निदान होताच त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे सुपुत्र डॉ. मनोहर कराड यांनी जवळपास दहा दिवस केलेल्या उपचाराला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या वेळी त्यांचा स्कोर ५ व ऑक्सिजन लेवल ९० होती.
खरे तर कोरोना या शब्दानेच अनेकांना धडकी भरते. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच बरेच रुग्ण मानसिकदृष्टया खचतात. अत्यंत कमी प्रमाणात लागण असूनही असे खचलेले रुग्ण बिकट अवस्थेत पोहोचतात. दादांसारख्या खंबीर व्यक्ति मात्र कोरोनावर मात करतात. दादांना डायबेटीस, ब्लडप्रेशर, मणक्याची व्याधी असली तरी शुद्ध शाकाहारी आहार, सकारात्मक विचार, आत्मविश्‍वास, आत्मिक मनोबल, वाचन व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. ९३ वर्षांच्या या योद्धाने वयाने तरूण असणाऱ्यांसाठी सकारात्मकतेची पेरणीच केली आहे.

Pralhad Patil
नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड



बाराही महिने थंड पाण्याने स्नान…

सध्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मांसाहार, अंडी, चिकन व प्रोटिनयुक्त आहाराचा जेवणात समावेश करण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. दादा मात्र पूर्णपणे शाकाहारी असून, नियमित वेळेत समतोल आहार घेतात. पहाटे योगा, व्यायाम, चालण्याबरोबरु बाराही महिने थंड पाण्याने स्नान करतात. देवपूजा व नामस्मरणात मग्न राहतात.



नेहमी व्यस्त दिनचर्या...

प्रल्हाद पाटील - कराड यांनी एकेकाळी राजकारणावर चांगली पकड निर्माण केली. अनेक दशकांपासून समाजकारण, राजकारणात कामकाज करीत असतांना शेतीनिष्ठ शेतकरी असलेल्या दादांनी शरद जोशी, माधवराव मोरे यांच्याबरोबर शेतकरी संघटनेला दिशा दिली. निसाकाचे चेअरमन, तालुका शेतकरी संघाचे चेअरमन, न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक विश्‍वस्त आदींसह विविध पदे भूषविलेले असून, आजही ते आपल्या कार्यात व्यस्त असतात.

Pralhad Patil
कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..



सकारात्मक विचार डोळयासमोर ठेवून वृद्धांसह तरुणांनीही कोरोनाला घाबरून न जाता प्राथमिक लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करावेत. नेहमी मन खंबीर ठेवल्यास कोरोनाला सहज हरवणे शक्य आहे आणि ते मी केले आहे.
- प्रल्हाद पाटील - कराड, ज्येष्ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.