राष्ट्रीय महामार्गावर 5 महिन्यात 94 अपघात

road accident
road accidentesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात हद्दीतून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांवर (National Highway) मागील पाच महिन्यांमध्ये ९४ अपघात (Accident) झाले आहेत. यात सर्वाधिक अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर झाले आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील या महामार्गावर एकूण एक हजार ३६३ अपघात झाल्याने राज्यात सर्वाधिक अपघात हे नाशिक जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे. मात्र यावर ठोस उपाययोजनादेखील राबविण्यात येत असल्याचे जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. (94 accidents on national highways in 5 months Nashik crime News)

जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय व इतर राज्य महामार्ग असून, मागील एक वर्षात एक हजार ३६३ इतके अपघात झाले आहेत. यामध्ये ७८८ अपघातांत मृत्यू झाले असून, ५३८ हे गंभीर, तर ४७ किरकोळ स्वरूपाचे अपघात होते. मागील काही वर्षांमध्ये महामार्गांवर झालेले अपघात लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून महामार्गावरील अपघातांचे १३२ ब्लॅक स्पॉट निश्‍चित करण्यात आलेले आहेत. अपघातांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक ती उपाययोजना आखूनही अपघातांची संख्या कमी झालेली नाही.

road accident
व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : बँक, पोस्‍टात रांगा... 2-4 तास थांबा...

मागील पाच महिन्यांचा विचार करत राष्ट्रीय व राज्य महामार्गवर अपघात हे शतकाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. मागील वर्षी मुंबई-आग्रा महामार्गावर जिल्ह्यात १६२ अपघात झाले होते. या पाच महिन्यांत या ठिकाणी सर्वाधिक ५७ अपघात झालेले आहेत. नाशिक-पुणे महामार्गावर २०२१ मध्ये २८ अपघात झाले आहेत. या वर्षी पाच महिन्यांत १३ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. जव्हार येथून येणाऱ्या महामार्गावरदेखील गेल्या वर्षी २६ अपघात झाले. चालू वर्षी २२ मेअखेरपर्यंत २४ अपघात झाले. जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्गावर वाढते अपघात हे चिंतेचे कारण बनले आहे.

road accident
टंचाईग्रस्त भागात 401 टँकरने पाणीपुरवठा; टंचाईत यंदा 244 वाड्यांची भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()