Railway Chain Pulling Case : मे महिन्यात चेन ओढण्याचा 941 घटना

chain pulling in train
chain pulling in trainesakal
Updated on

Railway Chain Pulling Case : मध्य रेल्वेने धावत्या रेल्वेत अतार्किक अलार्म चेन पुलिंग, बेकायदेशीर तिकीट, अनधिकृत फेरीवाले आणि मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थासह प्रवास करणाऱ्‍यांवर कडक कारवाई केली. मे महिन्यात ९४१ घटना उघडकीस आल्या. (941 cases of chain pulling in month of May nashik news)

मध्य रेल्वे आरपीएफने अलार्म चेन पुलिंग, बेकायदेशीर तिकीट, अनधिकृत फेरी आणि मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांसह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले, तसेच दंड आकारून कारवाई केली आहे.

एकट्या मे महिन्यात धावत्या रेल्वेत साखळी ओढण्याचा ९४१ प्रकरणांत ७११ व्यक्तींना अटक करीत २ लाख ७१ हजार २०५ रुपये दंड वसूल करण्यात आला. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये बेकायदेशीर तिकिटांची ४९ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि ५२ दलालांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chain pulling in train
Nashik News : सिडकोवासीयांच्या जिवाशी खेळ; 36 वर्षापूर्वी बांधलेला जलकुंभ झाला जीर्ण!

अनधिकृत फेरीवाले २७४१ प्रकरणे नोंदवण्यात आली. २७२९ अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करून १७ लाख २७ हजार ५८० रुपये दंड वसूल करण्यात आला. १ लाख १९ हजार ६८० रुपयांच्या अवैध दारूच्या ३६३ बाटल्या जप्त आणि ४ जणांना अटक करण्यात आली.

६४ किलो वजनाची आणि ८४,००० रुपये किमतीची अवैध तंबाखू उत्पादनांची १४ पाकिटे जप्त करण्यात आली. फालतू कारणांसाठी अलार्म चैन ओढू नका, अनधिकृत दलालांकडून तिकिटे खरेदी करू नका, अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन देऊ नका, रेल्वेतून दारू, तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाऊ नका, असे आवाहन रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

chain pulling in train
Nashik News : अंथरुणावर खिळलेल्या चिमुकलीवर नामकोत यशस्‍वी शस्‍त्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.