Nashik News : ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत बुधवारी (ता. २६) विविध विभागांतील तब्बल ९५ कर्मचारी उशिरा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या येण्याची वेळ तपासून संबंधित विभागप्रमुखांनाच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (95 Late comers in ZP notice issued by Head of Department after instructions of General Administration Department Nashik News)
शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यावर सोमवार ते शुक्रवारपर्यंत कार्यालयात येणाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहापर्यंत केली आहे. बुधवारी सकाळी १०.२० ला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी जिल्हा परिषदेतील सर्व २० विभागांचे हजेरी पुस्तक मागविले.
मुख्यालयात ४३५ कर्मचारी कार्यरत असून, यापैकी तब्बल ९५ कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत हजर नसल्याचे आढळून आले. त्यांना संबंधित विभागप्रमुखांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
नोटिसांचा खुलासा हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करावा, अशा सूचना दिल्या आहेत. मुख्यालयासह पंचायत समिती स्तरावरही वेळोवेळी अशी तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विभागनिहाय अनुपस्थित कर्मचारी
अर्थ विभाग (५), कृषी (७), पशुसंवर्धन (३), समाजकल्याण (८), महिला व बालकल्याण (१), प्राथमिक शिक्षण (१२),
माध्यमिक शिक्षण (४), आरोग्य (११), बांधकाम १ (१३), बांधकाम २ (७), बांधकाम ३ (६), लघुपाटबंधारे (१), ग्रामीण पाणीपुरवठा (४), समग्र शिक्षा अभियान (३), पाणीपुरवठा व स्वच्छता (५), मनरेगा (२), राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान विभाग (३).
"सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत येणे अपेक्षित असताना बहुतांश कर्मचारी हे उशिराने येतात. अशा कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल."
- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.