नाशिक : नद्यांचे उगमस्थान असलेल्या डोंगराची विल्हेवाट लावून कमाई करण्याचा सपाटा सुरू असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी भागात वन विभागाच्या जागा संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्या आहेत. त्यात त्र्यंबकेश्वरचे ९७ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याने डोंगर उत्खननातून जलस्रोत गायब करण्याच्या भूमाफियागिरीला आळा बसण्याची आशा वाढली आहे. (97 km area of Trimbakeshwar protected Land mafia will be stopped Nashik Latest Marathi News)
त्र्यंबकेश्वरशिवाय कळवण आणि इगतपुरी तालुक्यांतील संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह ९७ किलोमीटर, कळवण तालुक्यातील गुजरातलगतच्या भागासह ८४.१२ चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्र जाहीर झाले आहे. त्यात गुजरात राज्याच्या हद्दीला लागून सुरू होणाऱ्या कळवण क्षेत्रात संरक्षित क्षेत्रात समावेश झाला आहे. कळवण तालुक्यातील देसरणे, रळवजी, नाकोडे, एकलहरे, वाडी, बालापूर, जामळे, ढेकाळे यांसह २८ गावांतील क्षेत्राचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यातील ८८.४९ चौरस क्षेत्राचा परिसर संरक्षित म्हणून जाहीर झाला आहे.
इगतपुरीसंवर्धन राखीव क्षेत्रात भावली धरण परिसरासह सातुर्ली, ओडली, नागोसली, वालविहीर, धारगाव, चिंचला खैरा, त्रिंगलवाडी, पिंपळगाव भटाटा, धानोली, बोरटेंभे, पारदेवी, गिरणारे, इगतपुरी, तळोशी, भावली आंबेवाडी, कुरुंगवाडी, मानवेढेसह साधारण ८८४९.९४८ हेक्टर (८८.४९ ) चौरस किमी क्षेत्र संरक्षित जाहीर झाले आहे.
First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
ब्रह्मगिरी अन् मेटघर
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी मेटघर किल्ल्यासह संवेदनशील भागाचा यात समावेश झाला आहे. ब्रह्मगिरी, पावसाचा आंबोली, मेटघर किल्ला, काचुर्ली, वाघेरा जंगल भाग, मुंढेगाव, धाडोशी यांसह साधारण ३१ गावांतील विविध गटाचा समावेश आहे. त्यात ९७ चौरस किलोमीटर क्षेत्रात (९६९७.१३६ हेक्टर) असलेल्या वनक्षेत्रांच्या सीमा अशा- उत्तरेला वायघळपाडा गट ३५,३७, १९ वाघेरा गट २९०, २९१, २९२, केरीवाज, चिंचवड, जातेगाव बुद्रुक, पूर्वेला कोणे, गट २४५, २२७, वाघेरा, गोधड्याचा पाडा, माळेगाव गट. दक्षिणेस गोरठाण, वेळुंजे, पश्चिमेला वरसविहीर, खरवळ, गडदावणे, उत्तरेला मेटघर किल्ला आहे. वाघेरा जंगलाचा भाग, धाडोशी, काचुर्लीसह परिसराचा समावेश आहे.
भूमाफियागिरीला चाप
त्र्यंबकेश्वर भागातील मेटघर किल्ल्यासह अनेक महत्त्वाचा भाग प्रतिबंधित संरक्षित क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नेमक्या त्याच भागात ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव धरले आहे. पालिकेसह स्थानिक आमदारांनी गंगाद्वारच्या पायथ्याशी समाजमंदिरासारखी कामे सुचविली आहेत. त्यामुळे राजपत्रातील संरक्षित क्षेत्र प्रत्यक्षात जागेवर संरक्षण मिळेल की पळवाटा काढून त्यावर उपाय शोधले जातील, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.