नाशिक : सायबेरियाच्या दुर्मिळ ल्युसिस्टिक थापट्याचे दर्शन

तीस हजारांत एक पक्षी असतो ल्युसिस्टिक; आनुवंशिक उत्परिवर्तनामुळे रंगात बदल
नाशिक : सायबेरियाच्या दुर्मिळ ल्युसिस्टिक थापट्याचे दर्शन
Updated on

नाशिक : पारा घसरू लागल्याने नांदूरमधमेश्‍वर(nandur madhmeshwar) पक्षी अभयारण्यातील किलबिलाट वाढू लागला आहे. चापडगाव जवळील पूर्वेकडील निरीक्षण टॉवरवरून सायबेरियामधील दुर्मिळ ल्युसिस्टिक थापट्याचे दर्शन होत आहे. त्याला पाहण्यासाठी पक्षीमित्रांची गर्दी होऊ लागली आहे. तीस हजारात एक पक्षी ल्युसिस्टिक असल्याने त्याचे दर्शन दुर्मिळ मानले जाते. थापट्या अथवा परी बदक हिवाळ्यात देशात स्थलांतर करणारे बदक असून ते सायबेरियातून येतात.

नाशिक : सायबेरियाच्या दुर्मिळ ल्युसिस्टिक थापट्याचे दर्शन
नाशिकच्या के. के. वाघ अभियांत्रिकीला ‘शैक्षणिक स्वायत्तता’ संस्थेचा दर्जा

पक्ष्याचे डोके व मान चमकदार काळपट हिरवी असून छातीचा रंग पांढरा शुभ्र असतो. हे पक्षी भारत, श्रीलंका आणि मालदीव बेटात हिवाळी ‘पाहुणे‘ असतात. कीडे, अळ्या, लहान बेडूक, शंख-शिंपले, लहान मासे आणि सर्व प्रकारच्या बिया हे त्यांचे खाद्य आहे. त्यांची चोच अधिक लांब आणि पुढे चपट फावड्यासारखी असते. म्हणूनच त्याचे नाव थापट्या पडले असावे. ही लांब आणि चपट चोच अडीच इंच लांब असते. त्यावर जवळजवळ ११० अतिबारीक छिद्रे असतात. ज्यातून त्यांचे अन्न पाण्यातून गाळले जाते. थपट्यांच्या नराचे डोके चमकदार, झळाळणारे, हिरवे असते. छाती पांढरीशुभ्र असते. पोट आणि पंख चमकदार पिवळे, तपकिरी असतात. पंखावर खांद्याजवळ चमकदार राखाडी, निळसर ठिपका असतो. पंख उघडल्यावर चमकणारा, झळाळणारा हिरव्या रंगाचा पट्टा असतो.

थापट्यांची मादी मात्र साध्या रंगाची असते. तिचा पिवळसर रंग आणि तपकिरी ठिपक्यांचा असतो. उडताना तिच्या पिसांची टोके राखाडी निळसर दिसतात. त्याच्या खालची पिसे ही गडद हिरव्या रंगाची असतात. या बदकांची जोडी कायम असते आणि ते त्यांचे जोडीदार दर हंगामात बदलत नाहीत. पाण्याजवळ काड्यांच्या आधाराने त्यांचे घरटे बांधलेले असते. यात मादी अंदाजे ९ अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली त्यांची पिल्ले ही पुढे कित्येक दिवस पाण्याजवळच्या दाट झाडीत लपविली आणि वाढवली जातात.

नाशिक : सायबेरियाच्या दुर्मिळ ल्युसिस्टिक थापट्याचे दर्शन
स्वायत्तता दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांसाठी विद्यापीठाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात गेल्या महिन्याभरापासून मी पक्ष्यावर लक्ष ठेवून होतो. सुरवातीला तो पूर्ण पांढरा नव्हता. जशी थंडी वाढू लागली, तसा मादी पक्ष्याचा रंग पांढरा होत गेला. आता तो पूर्ण पांढरा झाला आहे.

- शंकर लोखंडे, गाइड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.