Adhar Card News : आधार प्रमाणिकरणास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद; 93.18 टक्के विद्यार्थ्यांना मिळाले Adhar Card

adhar card news
adhar card newsesakal
Updated on

Nashik News : शालेय शिक्षण विभागाने स्टुडंटस् पोर्टलवर १५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत दिली होती. मात्र, विविध तांत्रिक अडचणींमुळे आधार कार्डातील तपशील जुळत नसले, तरी जिल्ह्यातील ९३.१८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाच्या संख्येवरच संबंधित शाळांच्या संच मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षण विभागाकडून शिक्षक पदांना मान्यता (संच मान्यता) देण्यात येते. (Aadhaar authentication Good response in district 93.18 percent students got Aadhaar card Nashik News)

बनावट व बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक पदे भरण्यात आल्याचे काही वर्षापूर्वी उघडकीस आले होते. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाईन आधार नोंदणी करण्याची मोहिम शिक्षण विभागाने हाती घेतली आहे.

त्यानुसार संचमान्यतेपूर्वी सर्व शाळांनी अधारा प्रमाणिकरणाची मोहिम राज्यभर राबविली. आधार प्रामणिकरण न झाल्यास संबंधित शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश देखील राज्य शासनाने काढले होते. १५ जून अंतिम मुदत होती. मुदत वाढविण्याबाबतचे आदेश शासनाकडून प्राप्त झालेले नसल्याने प्रमाणिकरणाचे काम सुरूच असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

adhar card news
Nashik News : शेतीमालाचे भाव नसल्याने आराईत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

२६ हजारांवर विद्यार्थ्यांकडे कार्ड नाही

जिल्हाभरात १३ लाख २ हजार २७० विद्यार्थी असून, यातील यु-डायसवर १२ लाख १३ हजार ८७० विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे. त्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले असून, यातील ४७ हजार १६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड प्रमाणित नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ९३.१८ टक्के काम झाले आहे. तसेच, १५ हजार ४९६ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रीया सुरू आहे. तर, २६ हजार ३३८ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे दिसून आले आहे.

अडचणींचा डोंगर

शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन आधार प्रमाणीकरणासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी अनेक पालकांमध्ये आधारविषयी जनजागृती नसल्यामुळे त्यांनी पाल्यांचे आधारच काढलेले नव्हते. त्यामुळे शिक्षक, पालकांसमोरील अडचणींचा डोंगर असताना त्यांनी सकारात्मक काम केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

adhar card news
Adhar Card : शाळांकडून सक्ती, विद्यार्थी वेठीस; आधारकार्डच्या अपडेटसाठी धावाधाव

केंद्रनिहाय झालेले काम

केंद्र प्रमाणिकरण झालेले काम (टक्के)

चांदवड : ९९.०८

पेठ : ९८.०३

इगतपुरी : ९८.०१

सिन्नर : ९६.३७

दिंडोरी : ९५.८९

नाशिक : ९५.७७

निफाड : ९४.९७

येवला : ९४.७५

बागलाण : ९४.६४

नाशिक मनपा- १ : ९४.४८

त्र्यंबकेश्‍वर : ९४.४१

नाशिक मनपा- २ : ९३.८१

नांदगाव : ९३.४१

कळवण : ९३.३९

देवळा : ९२.६६

सुरगाणा : ९०.३९

मालेगाव : ८९.७७

मालेगाव मनपा : ८१.९८.

adhar card news
Sim Card Scam : डोंबिवलीत सिम कार्डचा काळाबाजार; 170 ग्राहकांच्या बनावट कागदपत्रावर सिमकार्डची बाजारात विक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.