Abasaheb More: यंदा घरात आणा गोमय बीज गणपती बाप्पा : आबासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Abasaheb More : मराठी माणूस आणि गणपती बाप्पा यांचं नातं नव्याने सांगायला नको. महाराष्ट्रातील गणेशोत्सव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हा महाउत्सव अनुभवण्यासाठी, या लोकोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून नागरिक, अभ्यासक येत असतात.

अलीकडे या उत्सवाने मात्र वेगळे रूप धारण केलेले दिसत आहे, असे मोठ्या दुःखाने म्हणावे लागते. आज या उत्सवात ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, गणेशमंडपातील व्यसने, जुगार अशा गोष्टी आज दिसत असून, यातील पावित्र्य नष्ट होते की काय, अशी भीतीही वाटते.

या विचारातूनच गुरुमाउलींनी काही उपाययोजना करण्याचे ठरवले आणि यातूनच ‘गोमय बीज गणपती’ ही कल्पना पुढे आली असून, गत वर्षी पाच हजार, तर या वर्षी २५ हजार घरांमध्ये हा बाप्पा जाणार असल्याचे आबासाहेब मोरे यांनी सांगितले. (Abasaheb More statement Bring cowpea seeds to the house this year Ganapati Bappa nashik)

आबासाहेब हे श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या पर्यावरण रक्षण आणि संवर्धन आणि स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. गोमय बीज गणपती बाप्पाबद्दल अधिक माहिती देताना आबासाहेब यांनी सांगितलं, की प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बाप्पाची स्थापना आणि या लाखो मूर्तींचे विसर्जन, यातून समुद्र, नदी, तलाव, विहिरी यात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाल्याने पर्यावरणाची हानी होऊन जलचरांना जीव गमवायची वेळ तर आलीच पण मनुष्यजातीसुद्धा प्रभावित होत आहे.

प्लॅस्टिक, थेरमोकोलच्या वापराने यात भर पडत आहे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारे गुरुमाऊली यामुळे अस्वस्थ आहेत आणि त्यांनी या हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, त्यापैकी गोमय गणेश या संकल्पनेस गत वर्षांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

हा गणपती माती, देशी गायीचे शेण, पंचगंव्य यापासून तयार झालेला असून, या प्रत्येक मूर्तीमध्ये आयुर्वेदिक, औषधी, भरपूर ऑक्सिजन, सावली देणाऱ्या वनस्पतीचे बीज टाकले आहे. या बाप्पाचे विसर्जन आपण आपल्या शेतात, परसबागेत, बागेत, सार्वजनिक जागेत केले तर त्यातून दर वर्षी एक झाड लावल्याचे आणि ते वाढविल्याचे पुण्य आपणास लाभणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : प्रेम हाच खरा धर्म... हीच ‘गुरुमाउलीं’ची शिकवण : चंद्रकांतदादा मोरे

गणपती अथर्वशीर्ष, गणेश, सरस्वती मंत्र, प्रज्ञाविवर्धन, नवग्रह स्तोत्र ही सेवा सेवेकरी वर्षभर करतच असतात; पण इतर भाविकांनीसुद्धा कर्णकर्कश संगीत लावण्यापेक्षा ही सेवा मोठ्या प्रमाणात रुजू करावी, असे आवाहन गुरुमाउलींच्या वतीने आबासाहेब मोरे यांनी केले.

बचतगटांना आर्थिक बळ

सेवामार्गशी संबंधित महिला बचतगटांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून या मूर्ती बनवून त्यांच्यामार्फतच विक्री होणार असल्यामुळे त्यांनाही दोन पैसे मिळणार आहेत. गणपती बाप्पाची शास्त्रशुद्धरीतीने स्थापना, गणेशोत्सव काळातील गणेश उपासना यावरसुद्धा या भगिनी मार्गदर्शन करतील.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ : गुरुमाउली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.