सिन्नर : येथील कांदा व्यापारी तुषार कलंत्री यांच्या बारा वर्षीय मुलाचे अपहरण प्रकरणातील चौथ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. या चारही संशयित आरोपींना सिन्नर न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ जानेवारी पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
येथील कांदा व्यापारी तुषार सुरेश कलंत्री यांचा बारा वर्षीय मुलगा चिराग याचे गुरुवारी (दि.५) मारुती ओम्नीमधून अपहरण करण्यात आले होते. (Abduction of 12 year old boy Fourth suspect in case is Arrested Nashik News)
ही वार्ता सोशल माध्यमातून शहरासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तसेच पोलीस पथक मागावर असल्याचे समजल्यानंतर घाबरलेल्या संशयितांनी चिरागला रात्री १ वाजेच्या सुमारास पुन्हा घराजवळ आणून सोडले होते.
याप्रकरणी पोलिसांनी रोशन नंदू चव्हाण, यश संदीप मोरे, आकाश भास्कर दराडे या तिघा संशयितांना अटक केली होती. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली ओमनी कार, टाटा मांझा ही दोन चारचाकी वाहने आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली.
त्यानंतर त्यांचा साथीदार संशयित राहुल रवींद्र वाणी (२३) याला अटक करण्यात आली. या चौघा संशयितांना सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय माळी, राहुल निरगुडे, किरण पवार, चेतन मोरे, अंकुश दराडे अधिक तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.