Abdul Sattar : आम्ही आमदार अपात्र ठरलो तरी इतिहासच! : अब्दुल सत्तार

Abdul Sattar
Abdul Sattaresakal
Updated on

Nashik News : जर न्यायालयात आमच्या १६ आमदारांविषयी अपात्रतेचा निर्णय झाला तरी इतिहास होईल किंवा आम्हाला अपात्र केले नाही तरी इतिहास होईल. (Abdul Sattar statement about coming Supreme Court order nashik news)

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी एक नियम ठरेल आणि त्यात आमची नावं असतील, त्यामुळे आम्ही अपात्र ठरलो तरी इतिहासच होईल. पण खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच राहील, असा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गुरुवारी (ता. ४) येथे केला.

नाशिक रोडला गुरुवारी झालेल्या कृषी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सत्तार म्हणाले, की निवडणूक आयोगाने आमच्याकडील बहुमत पाहून आम्हाला शिवसेना पक्ष व चिन्ह दिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, याची खात्री आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वासही आहे.

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आता होणार नाही, याविषयी त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की वज्रमूठ ही तुटली आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका बघितली तर यापुढे या मुठीचे खूप तुकडे झाल्याचे दिसतील.

Abdul Sattar
Civil Hospital : जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती

तवाच पलटी केला

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तव्यावरील भाकरी फिरविण्याऐवजी तवाच पलटी केला. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता त्यांच्या पक्षातील घडामोडींचा काय अंदाज बांधणार. शरद पवार राज्याचे नव्हे तर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. वयोमानानुसार ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवितील; हे अपेक्षित होते; पण त्यांनी मात्र निवृत्तीचा निर्णय घेत भाकरी असलेला तवाच पलटी केला. तरीदेखील शरद पवार यांनी जो निर्णय घेतला तो पक्षहिताचा घेतील, यात काडीमात्र शंका नाही.

राऊत रामप्रहरीचा भोंगा

खासदार संजय राऊत हे रामप्रहरीचा भोंगा आहे. रोज सकाळी आम्हाला शिव्या घालतात. मात्र ते खासदार आमच्या मतावर झाल्याचे विसरतात. याचा त्यांना विसर पडला आहे.

५२ जिल्ह्याचा निर्णय नाही

राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. ३१०० धनादेशांचे पैसे मिळत नाही, असे असताना आणखी नवीन २२ जिल्हे प्रस्तावित आहे. त्यासाठी पैसे कुठून आणणार हे विचारता सत्तार म्हणाले, की राज्यराज्यातील नवीन जिल्हा निर्मितीबाबत प्रस्ताव असून, मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील.

Abdul Sattar
Abdul Sattar : उत्तर महाराष्ट्रात 26 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.