Nashik News : उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीचे देण्यात आलेले काम काढून घेण्याबाबतची बैठक निवडणूक शाखेत झाली होती.
जिल्हा निवडणूक जिल्हा शाखेमध्ये सर्व संघटनाप्रमुखांना बोलविण्यात आले. यामध्ये सर्व विषयांवर चर्चा झालेली असल्याने यामध्ये उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
त्यामध्ये आजही सर्व संघटनांतर्फे बीएलओ कामे देण्यात येऊच नये, ही आग्रही भूमिका मांडली गेली. (Abolish BLO jobs from primary teachers statement to administration by teacher coordination committee Nashik News)
उपजिल्हाधिकारी डॉ. मंगरूळे यांनी सांगितले, की सर्व शिक्षकांनी प्रथम शिक्षणाचे पवित्र काम करणे महत्त्वाचे आहे. परंतु निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे बीएलओ म्हणून कामकाज करणेही आवश्यक आहे.
त्यामुळे यामध्ये आता आपण लोकसभा निवडणूक होईपर्यंत ज्या ठिकाणी बदल करण्याची परिस्थिती शक्य आहे.
त्या ठिकाणी आपण बदल करण्यासाठी प्रयत्नशील राहू, तसेच आठवडाभरात प्रत्येक तालुक्यात तहसीलदार व तालुक्यातील सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना बोलावून त्या-त्या तालुक्यातील ‘बीएलओ’बाबत विचारविनिमय करतील.
आवश्यक त्या ठिकाणी बीएलओ कामात बदल केले जातील, असे सांगितले. त्याचबरोबर एक शिक्षकी, द्विशिक्षकी, दुर्धर आजाराने ग्रस्त, स्तनदा माता यांना त्या कामांतून वगळण्यात येईल.
प्राथमिक शिक्षक संघातर्फे सरचिटणीस निवृत्ती नाठे, कार्यकारी अध्यक्ष धनंजय आहेर, पेन्शन जिल्हाध्यक्ष प्रदीप पेखळे, जिल्हा सल्लागार धनराज वाणी, शिक्षक समितीतर्फे जिल्हा नेते आनंदा कांदळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे, सरचिटणीस साहेबराव पवार, शिक्षक परिषदेच्या वतीने संजय पगार, शिक्षक भारतीतर्फे दिलीप धांडे, खासगी मुख्याध्यापक संघातर्फे नंदलाल धांडे व जिल्ह्यातील सर्व संघटना प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
निवडणूक आयोगाच्या बीएलओ नेमणुकीबाबत असलेल्या निकषानुसार सर्व विभागांचे उपलब्ध कर्मचारी यांचे प्रमाण व शिक्षकांचे उपलब्ध प्रमाण यांचा विचार करून ज्या ठिकाणी बिगरशिक्षक कर्मचारी उपलब्ध होत असतील, तेथे सर्वांची समप्रमाणात बीएलओ म्हणून नियुक्ती केली जाईल.
इतर सर्व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात येईल व त्यानंतर जर गरज भासली तरच शिक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याचे सांगितले.
यामध्येही सर्व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झाल्यानंतर जर शिक्षकांना देण्याची वेळ आली, तर त्यामध्येही महाविद्यालय, खासगी, अनुदानित, माध्यमिक, प्राथमिक या सर्वांना समप्रमाणात कसे घेता येईल, याचाही विचार केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.