Nashik Fraud Crime : बिनव्याजी कर्जप्रकरणी दीडशेवर तक्रारी; गुन्हे शाखेकडून चौकशी

कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडोंची फसवणूक करणाऱ्या बालाजी फायनान्शिअल प्रा. लि. विरोधात आत्तापर्यंत सुमारे दीडशेपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : हजार ते १२ हजार रुपयांच्या प्रोसेसिंग शुल्कावर दोन लाखांपर्यंत कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडोंची फसवणूक करणाऱ्या बालाजी फायनान्शिअल प्रा. लि. विरोधात आत्तापर्यंत सुमारे दीडशेपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

मंगळवारी (ता. २) दिवसभर पोलिस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये तक्रारदारांची गर्दी होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. (About 150 complaints regarding interest free loans nashik fraud crime news)

पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या के. के. प्लाझा येथे श्री. बालाजी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा.लि. व एस. के. फायनान्शिअल सर्व्हिसेस ॲण्ड मॅनपॉवर कन्सल्टन्सी अॅण्ड सर्व्हिसेस प्रा.लि.चे कार्यालय आहे. गेल्या आठवड्यामध्ये राजूर बहुला येथील तीन महिला तक्रारादारांच्या अर्जावरून आर्थिक गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी कार्यालयावर धाड टाकली.

या ठिकाणी बेहिशोबी आर्थिक व्यवहाराची शंका बळावल्याने इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश शेर (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये तक्रारदारांची रीघ लागली आहे.

मंगळवारपर्यंत सुमारे १५० पेक्षा अधिक तक्रारदारांनी तपास पथकाकडे तक्रारी दिल्या आहेत. कर्ज प्रकरणात एक हजारांपासून ते १२ हजार रुपयांपर्यंतच्या प्रोसेसिंग शुल्क आकारून संशयितांनी संबंधितांना ५० हजारांपासून २ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. याप्रकरणी संशयित लतिका खालकर ऊर्फ लावण्या पटेल, नवनाथ खालकर, सुगर औटे, विनोद जिनवाल ऊर्फ विकी, मोईनअली सय्यद, उत्तम जाधव यांनी अटक केली आहे.

crime
Nashik News: बिटको रूग्णालयात कोरोना ‘रॅपिड’ टेस्ट सुरू! अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब लवकरच सेवेत

तर संशयित कृष्णाराव रेड्डी, माधवन कृष्णन, श्रीनिवासन यांसह एजंट संशयित शफीक शेख, जयश्री गांगुर्डे, भाग्यश्री लिलके, तेजस्विनी अंभोरे, लता हिरे, शीलाताई, अलका लोंवय, परशुराम गावित, अशोक निकम, सलीम खान यासह वीस जणांचा समावेश आहे. याप्रकरणी संशयितांची पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, संजय पिसे यांच्या पथकातर्फे चौकशी सुरू आहे.

''संशयितांनी बालाजी फायनान्सशिअलच्या माध्यमातून शेकडोंची फसवणूक केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सहा संशयित अटक असून त्यांची चौकशी सुरू आहे.''- संजय पिसे, पोलिस निरीक्षक, शहर आर्थिक गुन्हे शाखा.

crime
Nashik ZP News : जि. प. प्रशासनाची थेट शिक्षण प्रधान सचिवांकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com