नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या
Updated on

नाशिक : आनंदवली येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील खुनाच्या गुन्ह्यातील साडेसात महिन्यांपासून फरारी असलेल्या मोका गुन्ह्यातील प्रमुख संशयित व भारतीय जनता पक्षाचा रम्मी राजपूत व त्याचा भाऊ जिम्मी यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. रम्मी याला हिमाचल प्रदेशातून, तर त्याचा भाऊ जिम्मी याला उत्तराखंड येथून पोलिसांनी अटक केली. पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी ही माहिती दिली.



गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारात मालमत्ता हडप करण्यास अडसर ठरत असलेल्या रमेश वाळू मंडलिक (वय ८०) वृद्ध शेतजमीन मालकाची ५ फेब्रुवारीला हत्या झाली होती. त्यांचा मुलगा विशाल यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना संघटित गुन्हेगारीचे धागेदोरे सापडले. त्यानुसार पोलिसांनी सचिन मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल मंडलिक, भूषण मोटकरी, सोमनाथ मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब भंडागे, भगवान चांगले, बाळासाहेब कोल्हे, गणेश काळे, सागर ठाकरे, वैभव वराडे, जगदीश मंडलिक, मुक्ता मोटकरी, गोकुळ आव्हाड, अमोल कालेकर, सिद्धेश्वर आंडे, दत्तात्रय सुरवडे यांच्यासह रम्मी आणि जगदीश आदींसह या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. साडेसात महिन्यांपासून फरारी असलेला रम्मी परमजितसिंग राजपूत व त्याचा भाऊ जिम्मी परमजितसिंग राजपूत यांनी जागेच्या वादावरून कट रचून मृत रमेश मंडलिक यांना ठार करण्याच्या या गुन्ह्यात भूमाफिया टोळीचा मास्टर माइंड व मुख्य आरोपी रम्मी राजपूत हा असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून फरारी या दोघांचा शोध सुरू होता.

नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या
दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश


जमीन गैरव्यवहार प्रकरणातील रम्मी आणि जगदीश वगळता इतर आरोपींना अटक झाली असून, त्यांना विशेष कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींविरोधात हत्या प्रकरणात मोका दाखल आहे. गुन्हा उघडकीस आल्यापासून रम्मी आणि त्याचा महत्त्वाचा साथीदार असलेला जगदीश त्र्यंबक मंडलिक फरारी होते. त्यांच्यावर गुन्ह्याचा कट रचणे, रमेश मंडलिक यांची हत्या करणे, त्याचे नियोजन आखणे या सर्व प्रमुख गुन्ह्यांमध्ये रमी आणि जगदीशच मास्टर माइंड असल्याचे समोर आले आहे. मात्र, मंडलिक यांच्या हत्येचे धागेदोरे मिळण्यास सुरवात झाल्यापासून ते दोघेही फरारी होते. यातील एक संशयित बाळासाहेब कोल्हे यांनी पोलिसांच्या मोका कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयाने पोलिसांची कारवाई योग्य ठरविल्यानंतर पोलिसांनी फरारी संशयितांच्या मालमत्ता जप्त करण्‍यासाठी हालचाली गतिमान केल्या होत्या.

नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या
नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे टोलनाका होणार बंद? गडकरी सकारात्मक


मोका प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी फरारी संशयितांच्या अटकेसाठी नाशिक जिल्हा न्यायालयातून स्टँडिंग वॉरंट मिळवले. फरारी असलेल्या आरोपींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. त्यामुळे पोलिसांकडीन रम्मी आणि जगदीश या दोघा संशयित आरोपींच्या मालमत्तेची माहिती संकलन सुरू असताना पंजाबला चार ते पाच दिवस तळ ठोकून चंदीगड, अमृतसर, हरियाना अशी सातत्याने हुलकावणी देणाऱ्या दोघांना तपासी पथकाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड माग काढताना त्याचा भाऊ त्यानंतर त्याच्यामार्फत हिमाचल प्रदेशात लपून बसलेल्या रम्मी याच्या मुसक्या आवळल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.