नाशिक : पावसामुळे तहानलेल्या गावांची संख्या निम्म्यावर

rain
rainsakal
Updated on

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वसाधारणच्या तुलनेत ८०.७ टक्के पावसाची नोंद राज्यात झाली आहे. मॉन्सूनच्या आगमनामुळे तहानलेल्या गावांची संख्या निम्म्याने कमी झाली असून, गेल्या दोन आठवड्यात २४४ टँकर बंद करण्यात आले आहेत. एका आठवड्यात ठाणे, रत्नागिरी, पालघर, जालना, परभणी या जिल्ह्यातील टँकरची संख्या शून्य झाली आहे.

जूनच्या मध्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा कायम होती. त्यामुळे राज्यातील ६३४ गावे आणि १ हजार ३९६ वाड्यांसाठी ५२७ टँकरद्वारे २० जूनला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. २८ जून २०२१ ला २९७ गावे आणि १८७ वाड्यांसाठी २५० टँकर सुरू होते. तसेच २७ जून २०२२ ला ६१० गावे आणि १ हजार २६६ वाड्यांसाठी ४९६ टँकर धावत होते. आता ३०६ गावे आणि ५२६ वाड्यांना २८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील २ पाड्यांना एका, सांगलीतील १ गावाला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संपूर्ण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील ९ गावे आणि ८ वाड्या अजूनही तहानलेल्या असून, ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

rain
PHOTO : कोकणातला पाऊस, पहा डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य

जिल्हानिहाय टँकरची स्थिती

तहानलेल्या गावे आणि वाड्यांची संख्या जिल्हानिहाय व कंसात सुरु असलेल्या टँकरची संख्या : नाशिक-४८-४० (३४), धुळे-३-२ (३), जळगाव-१३-० (११), नगर-४३-१३४ (२६), सातारा-१६-३९ (१२), औरंगाबाद-४-१ (५), बीड-५-४ (६), हिंगोली-३-० (३), नांदेड-१२-१३ (१७), अमरावती-२०-० (२४), वाशिम-८-० (८), बुलढाणा-२७० (२७), यवतमाळ-३१-० (२९), नागपूर-२०-० (१७). दरम्यान, विभागनिहाय २० जून २०२२ ला टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची व त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अनुक्रमे अशी : कोकण-२२०-६७६-११६, नाशिक-१५६-३३५-१२५, पुणे-७८-३४६-७९, औरंगाबाद-७१-३९-९४, अमरावती-९०-०-९२, नागपूर-१९-०-२१. २० जूनला सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकही टँकर सुरू नव्हता.

rain
नाशिक : आषाढात पचनास सुलभ पदार्थांचे सेवन

राज्यातील पावसाची टक्केवारी

विभागाचे नाव आतापर्यंतचा पाऊस

कोकण ७८.५

नाशिक ७४.१

पुणे ४६.८

औरंगाबाद ११४.३

अमरावती ८४.३

नागपूर ८४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()