मोबाईल दाखविण्याचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

crime
crimeesakal
Updated on

नाशिक : म्हसरुळ परिसरामध्ये मोबाईल दाखविण्याचा बहाणा करीत, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. कुणाल उर्फ कान्हा मगन जाधव (२२, रा. मोताळा, जि. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, सुनावणीदरम्यान पीडित मुलगी फितूर झालेली असतानाही पोलीस तपास आणि साक्ष याआधारे न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली आहे.

crime
शिवसेना मोर्चा प्रकरणी 10 जणांवर गुन्हे दाखल

म्हसरुळच्या प्रभातनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलीला मार्च २०२० मध्ये पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले असता, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पालकांनी केलेल्या चौकशीत तिने आरोपी कुणाल याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. तसेच, ही माहिती कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले होते. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात बलात्कारासह पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करून आरोपी कुणाल यास अटक केली होती.

सदरील गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी फितुर झाली होती. मात्र, म्हसरुळ पोलिसांनी केलेला तपास आणि न्यायालयात सादर साक्ष-पुराव्यांच्या आधारे न्यायधीक्ष डी.डी. देशमुख यांनी आरोपी कुणाल यास २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

crime
लैंगिक छळाबाबत पुरावे नसल्याने घरकामगार महिलांची तक्रारीस टाळाटाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.