Nashik ZP School : जिल्हा परिषद शाळेला कोणी शिक्षक देता का... विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Academic loss of students due to teacher vacancies at ZP school nashik
Academic loss of students due to teacher vacancies at ZP school nashikesakal
Updated on

Nashik ZP School : शिक्षक नसतील तर शाळाच बंद करा...आम्ही आमच्या पोरांना मेंढ्या नाही तर म्हशी घेऊ... गोराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची रिक्त पद असल्याने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व्यवस्थापन समितीने गटविकास आधिकारी व प्रभारी गटशिक्षण आधिकारी यांची भेट घेतली व वरीष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. (Academic loss of students due to teacher vacancies at ZP school nashik news)

गोराणे (ता.बागलाण) येथील गावाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत वर्ग असून शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत गेल्या पाच वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पटसंख्येवर परिणाम झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे नाहक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेक पालकांनी आपले पाल्य दुस-या शाळेत दाखल केले आहेत.

या शाळेत शिक्षक मिळावेत यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून तसेच व्यवस्थापन समितीकडून वारंवार शिक्षण विभागात पत्रव्यवहार तसेच तोंडी पाठपुरावा सुरू आहे मात्र रिक्त पदांची पूर्तता होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सोमवार (ता.२३) सरपंच दिनेश देसले, ग्रामपंचायत सदस्य यशवंत देसले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवंत बापू देसले, उपाध्यक्ष सौ.अहिरे, माजी सरपंच भटू दोधा देसले, रातीरचे सरपंच समाधान अहिरे, चिंतामण देसले, सुनील जाधव व पुरूषोत्तम खैरनार आदी शिष्टमंडळाने नुकतीच गटविकास आधिकारी डाॅ. लता गायकवाड यांच्या दालनात प्रभारी गटशिक्षण आधिकारी चित्रा देवरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

Academic loss of students due to teacher vacancies at ZP school nashik
Nashik ZP Schools: शाळा बांधकामाचे 25 कोटी पडून; साडेआठ कोटींचे नियोजनही रखडले

बैठकीत गोराणे येथील जिल्हा परिषद शाळेविषयी साधकबाधक चर्चा करण्यात आली. गटशिक्षण आधिकारी चित्रा देवरे यांनी सांगितले की, तालुक्यात ९५ शिक्षकांचे पद रिक्त आहेत तर ३७ पदवीधर शिक्षक आहेत यात ८ शिक्षकांचे पद रिक्त आहेत. दिवाळीनंतर आपण गोराणेतील शाळेत लक्ष केंद्रित करून वरीष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले व बैठकीस पूर्णविराम केला.

शिक्षक नसतील तर वर्ग बंद करा

गोराणेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहावी सातवीला शिक्षक नसल्याने अनेक वेळा पाठपुराव्यानंतरही शिक्षण विभागाकडून डोळेझाक केली जात आहे. दिवाळीनंतर शिक्षकांची रिक्त पदे भरली नाहीत तर शाळाच बंद करण्यात येईल असे शिष्टमंडळाने बैठकीत सांगितले तसेच विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. दरम्यान गावानजीक असलेली पावडदेव वस्तीशाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळा शिक्षण विभागाला बंद करू देणार नाहीत अशी आक्रमक भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

''पटसंख्येनुसार शिक्षक देण्याचे धोरण शिक्षण विभागाने घेतले आहे आज बऱ्याच जिप शाळेत सात वर्ग व दोन किंवा तीन शिक्षक आहेत. आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण जिप शाळेतच होईल असा बोभाटा शिक्षण विभाग करतो आहे. मुळात पटसंख्येच्या आधारावर शिक्षक देऊन जिप शाळा अपंग करण्याचे काम शिक्षक विभाग करत आहे शिक्षण विभागाला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक देने परवडत नसेल तर जिप शाळा बंद करून घ्याव्यात महाराष्ट्रातील गरीब जनतेवर उपकार केल्यासारखे शिक्षण विभागाने वागू नये.''-दिनेश देसले, सरपंच गोराणे.

Academic loss of students due to teacher vacancies at ZP school nashik
Nashik ZP School : येवला मतदारसंघातील जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.