म्हसरूळ (जि.नाशिक) : नाशिक बाजार समितीचे (nashik market committee) माजी सभापती शिवाजी चुंभळे (shivaji chumbhale) यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) चौकशी सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीकडे पत्रव्यवहार केला असून, चुंभळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांची तपशीलवार माहिती सचिवांकडे मागितली आहे. (ACB-inquires-into-shivaji-Chumbhale-work-jpd93)
‘एसीबी’कडून चुंभळेंच्या कामांची चौकशी
२०१७- २० कार्यकाळात शिवाजी चुंभळे नाशिक बाजार समितीचे सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे झाली आहे. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली असून, बाजार समितीस सोमवारी (ता. २) पत्र दिले आहे. चुंभळे यांच्या काळात जवळपास ३० बांधकामे झाली असल्याचा पत्रात उल्लेख आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया, मंजुरी केव्हा व कोणी दिली, निविदा कधी व कोणत्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आल्या, निविदेचा कालावधी किती दिवस होता व मूळ वृत्तपत्र कात्रणे, निविदा कोणी व कधी मंजूर केल्या, कोणाच्या निविदा प्राप्त झाल्या व त्यांची कागदपत्रे, निविदा कोणाची स्वीकारण्यात आली, त्या संबंधीची कागदपत्रे, संबंधित मंजूर कामास कधी सुरवात झाली, काम पूर्ण झाले ते कसे, त्यापोटी किती रकमेचे बिल अदा केले व कोणाच्या आदेशानुसार त्यासंबंधी कागदपत्रे, कामाचा परीक्षण अहवाल, मूल्यांकन व पूर्णत्वाचा दाखला कोणी दिला, कामाची पूर्तता झाल्यानंतर अंतिम देयके सादर केले असल्यास त्यासंबंधी कागदपत्रे, बाजार समितीकडून शिवाजी चुंभळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी झाली असल्यास त्या अधिकाऱ्यांची नावे, अशी सर्व माहिती व यासंदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागविल्या आहेत.
या कामांची होणार चौकशी
ई नाम योजनेत बांधलेल्या समिती सेलहॉलच्या दुरुस्तीचे काम, विविध किरकोळ कामे, पंचवटीतील बाजार समितीचे लोखंडी प्रवेशद्वार, व्यापारी संकुल कार्यालये साफसफाई, शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड बेसमेंट साफसफाई व ड्रेनेज दुरुस्ती काम, ई नाम व टोमॅटो मार्केट केबिन, कांदा मार्केटमधील गाळा क्रमांक ५२ समोरील ट्रीमोकस काँक्रिटीकरण, बाजार समिती कार्यालय सीसीटीव्ही आदी कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे.
चुंभळेंच्या अडचणी वाढणार
बाजार समितीत ई-नाम योजनेंतर्गत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची पुढील मुदत वाढवून देण्यासाठी तत्कालीन सभापती शिवाजी चुंभळे यांना १६ ऑगस्ट २०१९ ला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. हे प्रकरण अद्याप प्रलंबित असताना, आता बाजार समितीतील गैरकारभार प्रकरणी लाचलुच प्रतिबंधक विभागानेच चुंभळे यांच्या कार्यकाळातील कामाची चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.