Facebook Money Fraud : रिक्वेस्ट स्वीकारताय.. सावधान! फेसबुकद्वारे होऊ शकते तुमची फसवणूक

Facebook Fraud
Facebook Fraudesakal
Updated on

Facebook Money Fraud : मागील अनेक वर्षांपासून तुम्ही ओळखत असलेल्या आणि तुमच्या प्रत्येक अपडेटला लाईक कमेंट करणाऱ्या तुमच्या जुन्या मित्राच्या नावाने नवी फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल तर सावधान! ती रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू नका. तुमच्या ते अंगलट येऊन त्यात तुमची फसवणूक होऊ शकते. (Accepting Requests Facebook can cheat you nashik fraud crime news)

फेसबुकच्या माध्यमातून पैशाची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तरीही केवळ निष्काळजीपणामुळे अनेकजण या फसवणुकीचे बळी ठरत आहेत.

ज्यांचे फेसबुक खाते लॉक नाही, अशी खाती निवडून अथवा एखाद्या बनावट वेबसाइटला तुम्ही भेट दिल्यानंतर तुमच्या फेसबुकमधील नाव व छायाचित्र वापरून नवी बनावट खाते उघडले जाते. तुमच्या मित्र यादीतील मित्रांना नवी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते.

या मित्रांनी रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर बनावट खातेधारक तुमच्या नावाने तुमच्या मित्रांना मॅसेंजरच्या माध्यमातून संवाद साधतो व तातडीची गरज असल्याचे सांगून पैशाची मागणी करतो. खात्री न करता पैसे पाठविल्यास फसवणूक होऊ शकते.

मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही केवळ निष्काळजीपणामुळे अनेकांची फसवणूक होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Facebook Fraud
Facebook Fraud : फेसबुकवर महिलांशी मैत्री करुन लाखोंची फसवणूक, विदेशी टोळीतील एकाला अटक

फेसबुक खातेदारांनो...

- तुमच्या फेसबुकचे प्रोफाइल लॉक करा.

- फक्त मित्रांनाच ते दिसावे

- अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका

- प्रचंड लिंकवर विनाकारण क्लिक करू नका

- तुमच्या नाव व छायाचित्राचा वापर इतर कोणी करते का पाहा.

तर अशी घ्या विशेष दक्षता

- जुन्या मित्राची नवी रिक्वेस्ट आल्यास खात्री करूनच स्वीकारा.

- पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष संपर्क करा.

- तर्क लावा, ज्याच्याशी आपला कधी व्यवहार नाही, तो कशाला पैसे मागेल?

हे आवर्जून कराच..

- आपल्या खात्याचा पासवर्ड वारंवार बदला

- कुणाचेही बनावट खाते आढळल्यास संबंधिताला कळवा.

- बनावट खाते बंद करण्याची सुविधा फेसबुकवरच आहे.

- उजव्या कोपऱ्यातील तीन डॉटमध्ये क्लिक करून अकांउट फेक असल्याचा रिपोर्ट करा.

Facebook Fraud
Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.