Nashik : प्रशस्त रस्त्यांच्या शहराला ‘Black Spot’ चे गालबोट

accident nashik latest marathi news
accident nashik latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : राज्यभरात नाशिक शहरातील प्रशस्त, सुंदर रस्त्यांचे कौतुक होते. असे असतानाही शहराच्या मध्यातून मार्गस्थ होणाऱ्या महामार्गामुळे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी उड्डाणपूल साकारण्यात आला.

या उड्डाणपुलामुळे अपघातप्रवण क्षेत्रात घट होणे अपेक्षित होते. परंतु, त्यात घट न होता कायम असून, अपघात वाढले आहेत. तसेच, शहरातील अपघातप्रवण (Accidental Black Spots) ठिकाणांमध्येही नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशस्त रस्त्यांचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकला वाढत्या अपघात व वाढलेल्या ब्लॅक स्पॉटचे गालबोट लागले आहे. (accident black spots increase in city nashik latest marathi news)

शहराची भौगोलिक रचना आणि येथील प्रशस्त रस्त्यांची नेहमीच अनेकांना भुरळ पडते. मुंबई, पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्या तुलनेत शहरात वाहतूक कोंडीची समस्या कमी भेडसावते.

असे असले तरी शहरात अपघाताच्या घटना सातत्याने घडतात. वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी अनेक बायपास रस्त्यांची निर्मिती केली गेली. तरीही वाढती लोकसंख्या, वाढलेली वाहने आणि प्रशस्त रस्त्यांमुळे वाहनांचा वाढलेला वेग यामुळे अपघातांना निमंत्रणच मिळते आहे.

परिणामी, अपघातप्रवण क्षेत्र वाढले आहेत. शहरातून मुंबई - आग्रा महामार्ग, नाशिक - पुणे महामार्ग व नाशिक - औरंगाबाद हे तीन आंतरराज्य मार्ग जातात. या मार्गांवरील वाढती वाहतूक व अपघातांमुळे मुंबई- आग्रा महामार्गावर उड्डाणपूल साकारला. पूर्वी याच मार्गावरील रासबिहारी चौफुली, के. के. वाघ कॉलेज, जत्रा हॉटेल, ट्रक टर्मिनल याठिकाणी सतत अपघात होत.

उड्डाणपुलामुळे येथील अपघातांना आळा बसेल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. अद्यापही ही ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र म्हणूनच गणली जात आहेत. त्यामुळे शहरातील पूर्वीच्या अपघातप्रवण क्षेत्रात आणखी तीन ठिकाणांची भर पडली आहे. तर, फक्त सहा ठिकाणांवरील अपघात कमी झाल्याने त्यांचा ब्लॅक स्पॉटमधून वगळण्यात आले आहे.

accident nashik latest marathi news
Nashik : मुख्य मार्केट यार्ड समोरील वडाचे झाड कोसळले

शहरातील ब्लॅक स्पॉट (२०२१ नुसार)

ट्रक टर्मिनल (आडगाव), रासबिहारी चौफुली, शिंदे गाव, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राऊ हॉटेल सिग्नल, के.के. वाघ कॉलेज, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहेडीगाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, तारवालानगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्स्लो पॉइंट (अंबड-सातपूर लिंक रोड), पळसे

घटलेले ब्लॅक स्पॉट

शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, स्टेट बँक चौक (लेखानगर), नांदूर नाका सिग्नल, मिरची हॉटेल सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल.

वाढलेले ब्लॅक स्पॉट

पळसे बस स्टॉप, ट्रक टर्मिनल (आडगाव), एक्स्लो पॉइंट (अंबड-सातपूर लिंक रोड)

accident nashik latest marathi news
Nashik : तरुणीकडून तोंडावर स्प्रे मारून युवकाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.