Nashik Accident News: ओझर शिर्डी महामार्गावर वडांगळी हिवरगाव रस्त्यावर अपघात; शाळकरी मुलाचा मृत्यू

Accident News
Accident Newsesakal
Updated on

Nashik Accident News : येथील ओझर शिर्डी महामार्गावर वडांगळी हिवरगाव रस्ता भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने धडकाने शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे.

शाळकरी भावंडे गाडी शिकत असताना हा अपघात घडला आहे. शाळकरी मुलांचा थोरला भाऊ गंभीररित्या जखमी झाला आहे. (Accident on Wadangali Hivargaon Road on Ozar Shirdi Highway Death of schoolboy Nashik News)

शनिवारी ता. 22 दुपारी अडीच सुमारास ही घटना घडली आहे. येथील माळरान शिवारातील (स्व).नितीन अरुण अढांगळे यांचे शाळकरी मुले शाळा सोडल्यानंतर घरी आले. घरात आई आजी नसल्याने गाडी शिकण्यासाठी मोटारसायकल घेतली.

माळहुन अजय नितीन अढांगळे( वय 13) महेश अढांगळे हे दोघे भावंडे गाडी घेऊन आले. महेशने गाडी घेऊन कोमलवाडीच्या भोर वस्ती जवळ आले. येथे डी पी चौफुली आहे. त्यामुळे भरधाव वेगाने महामार्गावरून हिवरगाव ते वडांगळी वेगाने वाहने जातात.

शाळकरी भावंडे गाडी शिकविण्याच्या नादात असताना भरधाव वेगाने वाहन आले. त्याने मोटारसायकलला धडक दिली. त्यात लहान भाऊ अजय रस्ता वर पडला. ह्या अज्ञात वाहनाने चाक डोक्यावर वरून गेल्याचे समजते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident News
Chh. Sambhajinagar Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, एक जखमी

त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. थोरला भाऊ महेश हा गंभीर रित्या जखमी झाला आहे. महामार्गावरून जाणार्या वाहनधारक व शेतकरी बांधवांनी अपघात ग्रस्त अढांगळे भावंडं यांना मदत कार्य केले आहे.

जखमी महेश ला पुढील उपचारासाठी सिन्नरला पाठविण्यात आले आहे. अज्ञात वाहन ट्रॅक्टर होते असे जखमी महेश यांने ग्रामस्थांना संगितले आहे. अजय हा वडांगळीच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात सातवीत शिकत होता.

मागील वर्ष अजयचे वडील शेतकरी नितीन अरूण अढांगळे यांचा शेतात काम करताना संर्पदंशाने निधन झाले आहे. आज अढांगळे परिवारात पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Accident News
Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यात सहा महिन्यांत ३९१ जणांचा अपघातात मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.