वणी-नाशिक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच

vani-nashik highway
vani-nashik highwayesakal
Updated on

वणी (जि.नाशिक) : नाशिक-दिंडोरी रस्त्यावर गुरुवारी एकच तासात ९ अपघात झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा रणतळे याच ठिकाणी आणखी एक दुर्घटना घडली आहे. या ठिकाणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भेट देणार होते. मात्र ते येण्या अगोदरच याच ठिकाणी विचित्र पद्धतीने दुर्घटना घडल्या आहेत. (accident-vani-nashik-highway-marathi-news)

एकाच तासात ९ अपघात झाल्यानंतर आणखी एक दुर्घटना

सहा दिवसांत या परिसरात १८ वाहने अपघातग्रस्त झालेली आहेत. एकाच तासात ९ अपघात झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा रणतळे याच ठिकाणी वाहनाचा तिहेरी अपघात झाला. यात दोन कंटेनर व मारुती व्हॅनचा समावेश आहे. वणी-नाशिक रस्त्यावरील रणतळे परिसरात वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, आजही याच परिसरात दोन कंटेनर व मारुती व्हॅन यांच्यात तिहेरी अपघात झाला. सुदैवाने या अपघातमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून, या ठिकाणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भेट देणार होते. मात्र ते येण्या अगोदरच याच ठिकाणी विचित्र पद्धतीचे अपघात झाले आहे. किती अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग या अपघात प्रवणक्षेत्रात सुधारणा करणार, अशी चर्चा सर्व तालुकाभर होत आहे.

वाहनचालकावर दिंडोरी पोलिसांत अपघाताचा गुन्हा

दिंडोरी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. पुढे चांगल्या पावसाला सुरवात झाल्यास या रस्त्याचे काय होणार अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत असून दिंडोरी ते आक्राळे फाटादरम्यान वाहाने चालकांनी संथगतीने व सावधानतेने चालविणे आवश्यक झाले आहे. या ठिकाणच्या अपघातांच्या मालिकाची विधानसभेचे प्रभारी उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी गंभीर दखल घेतली असून, या रस्त्याबाबत आमदार झिरवाळ स्वत: शनिवारी (ता.१२) दिंडोरी येथे येऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना बोलावून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली. वणी-दिंडोरी रस्त्यावरील वलखेड फाटा, कोलवण पुलाजवळ गुरुवारी रात्री दुचाकीस वाहनाने धडक दिल्यामुळे देवीदास राऊत (रा. गांधीनगर दिंडोरी) हा युवक जागीच ठार झाला. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अज्ञात वाहनचालकावर दिंडोरी पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

vani-nashik highway
नाशिकमधील सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम रखडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.