Nashik Eye Infection: शहरात डोळे, तापाची साथ; महापालिकेच्या रुग्णालयात डोळ्याचे 180, तापाचे 170 रुग्ण

Eye Infection
Eye Infectionesakal
Updated on

Nashik Eye Infection : मुंबई व पुणेपाठोपाठ नाशिक शहरातदेखील डोळ्यांची साथ आली असून, त्याअनुषंगाने महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरातील शाळांमध्ये नोडल ऑफिसरच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, गुरुवारी (ता. २७) बिटको व झाकिर हुसेन रुग्णालय वगळता अन्य रुग्णालयातून डोळ्याचे १८०, तर तापाच्या १७० रुग्णांची नोंद झाली आहे. (accompanied by eyes infection fever 180 eye patients 170 fever patients in nmc hospital nashik)

मागील पंधरवड्यापासून शहरात डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. विशेष करून लहान मुलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. सुरवातीला एक ते दोन असे प्रमाण होते.

मात्र, संसर्गाचे प्रमाण वाढत गेल्याने आज तब्बल १८० रुग्णांची नोंद महापालिकेच्या स्वामी समर्थ इंदिरा गांधी रुग्णालय व ३० आरोग्य केंद्रात झाली आहे.

सर्वाधिक रुग्णांची वर्दळ असलेल्या नाशिक रोड येथील स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व झाकिर हुसेन रुग्णालयातील रुग्णांची आकडेवारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाली नाही.

उद्यापर्यंत ही आकडेवारी आल्यानंतर डोळे विकार व तापाचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तुळात आली आहे. डोळे विकाराचे १८० रुग्ण, तर तापाचे १७० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या तुलनेत मलेरिया व अतिसाराच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eye Infection
Nashik Dengue Update : शहरात डेंगीचाही वाढता विळखा...

पावसामुळे संसर्गजन्य आजारांची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. डोळ्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयाव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्येदेखील डोळे तपासणीचे प्रमाण वाढले आहे. तापाचे रुग्णदेखील वाढले असून, ही संख्या मोठी असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.

"डोळे येणे हा मोठा आजार नाही, मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. डोळे चोळू नये, तसेच हात स्वच्छ धुवावे. शाळांमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला डोळे आल्यास त्याला तीन ते चार दिवसांची सुट्टी द्यावी." - डॉ. नितीन रावते, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

Eye Infection
Nashik News: ‘शून्य कचरा’ उपक्रमाला बोहरी समाजाची साथ; मोहरमनिमित्त उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.