Nashik News: दूध संकलनाचा हिशोब ग्रामपंचायतकडे द्यावा लागणार; सिन्नर तहसीलदारांचे निर्देश

milk
milk esakal
Updated on

सिन्नर : तालुक्यातील दूध संकलन केंद्रांतून दुधात भेसळ होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी दूध संकलन केंद्र चालकांकडून दूध संकलनाच्या आवक-जावक माहितीचा तपशील ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिले आहेत.

याबाबत पंचायत समितीला लेखी सूचना दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमार्फत दूध संकलन केंद्रांना पत्र दिले आहे. (Account of milk collection to be given to Gram Panchayat Instructions of Sinnar Tehsildars Nashik News)

सिन्नर तालुक्यात १०० हून अधिक दूध संकलन केंद्र आहेत. त्यांच्यामार्फत रोज सुमारे ७० हजारांहून अधिक लिटर दूध संकलित होते. केंद्रांमार्फत राजहंस, सिन्नर दूध संघ, गोंदेश्वर आदी ठिकाणी दूध पाठविले जाते.

पूर्व भागात पांगरी, पंचाळे, शहा, वावी, पाथरे, वडांगळी, सोमठाणे, उजनी या परिसरात दूध संकलन सर्वाधिक होते. तालुक्यातील मीरगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून दुध भेसळीचा प्रकार उघडकीस आणला होता.

मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा कॉस्टिक सोडा वापरून दूध भेसळ केली जात होती. या कारवाईत रसायनांचा पुरवठा करणाऱ्यांकडून ११ लाख रुपयांच्या ३०० गोणी मिल्क पावडर व सात गोणी कॉस्टिक सोडा जप्त केला होता.

त्यानंतर भाऊसाहेब बैरागी यांनी भेसळीचे प्रकार थांबविण्यासाठी संकलन केंद्रांच्या माहितीची नोंद व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावरून तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी गटविकासाधिकारी महेश पाटील यांना कार्यवाही करण्याची लेखी सूचना दिली आहे.

milk
Milk Rate : ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला घरघर! दुधाचे दर कमी, पशु खाद्यांचे व चाऱ्याच्या दारात वाढ

दूध संकलन केंद्रांनी त्यांच्याकडील दहा दिवसांचा दूध संकलनाच्या आवक-जावकचा हिशोब ग्रामपंचायतीत सादर करावयाचा आहे. संकलित झालेली सर्व माहिती सिन्नर तहसीलदारांकडे पंचायत समितीमार्फत पाठवली जाईल.

यामुळे दूध भेसळीसारख्या गंभीर प्रकरणांवर नियंत्रण येऊ शकते. दूध संकलन केंद्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आणलेले दूध आणि केंद्रामार्फत बाहेर पाठविण्यात येणारे दूधाचा ताळमेळ प्रशासनास समजणार आहे. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दूध संकलन केंद्राची माहितीही उपलब्ध होणार आहे

"तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दूध केंद्रात संकलित होणाऱ्या दुधाच्या आवक जावकचा हिशेब ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतींना पत्र दिले आहे. दूध संकलन व संबंधित नियंत्रण ग्रामपंचायतीकडे येत नाहीत. मात्र, तहसीलदारांनी केलेली सूचना व दूध भेसळीसारखे गंभीर प्रकार रोखण्यासाठी अर्जदाराचा सामाजिक हेतू विचारात घेऊन ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत."-महेश पाटील, गटविकासाधिकारी, सिन्नर

milk
Nashik: गाईच्या दूधाला 50 रुपये लिटर भाव द्या; हरसूले येथे शिवसेना शिंदे गटाकडून रस्त्यावर दूध ओतून आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.