Nashik Bribe Crime : आश्रमशाळा इमारत भाड्याच्या बिलासाठी लाच घेताना लेखाधिकारी अटक

Two junior assistants were arrested in bribe crime Nandurbar  news
Two junior assistants were arrested in bribe crime Nandurbar newsesakal
Updated on

Nashik Bribe Crime : आश्रमशाळेच्या भाड्याच्या इमारतीसाठी दिलेल्या जागेचे बिल काढण्यापोटी १० हजारांची लाच घेताना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लेखाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

भास्कर रानोजी जेजूरकर (वय ५३, रा. कुलस्वामिनी रो हाऊस, भवानी पार्क, भगवतीनगर, हिरावाडी) असे लाचखोर लेखाधिकाऱ्याचे नाव आहे.

संशयित जेजूरकर हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात वर्ग दोनचा लेखाधिकारी आहे. (Accountant arrested for taking bribe for rent bill of ashram school building nashik crime news)

आंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील शासकीय आश्रमशाळेसाठी एका तक्रारदाराच्या वडिलांनी २०२१ पासून २०२४ अशा तीन वर्षांसाठी त्यांच्या गट नं. ७९/२ व ७९/३ ही या जागेवरील दोन इमारती आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्यापैकी एक इमारत क्रमांक ४२२ चे ९९ हजार ९९८ रुपये, तर दुसरी इमारत मासिक ५५ हजार रुपये भाड्याने तीन वर्षांसाठी दिली आहे.

आंबोली येथील शासकीय आश्रमशाळेसाठी भाड्याने दिलेल्या या दोन्ही इमारतींपैकी इमारत क्रमांक ४२२ (१) या इमारतीचे एप्रिल ते जून २०२३ असे तीन महिन्यांचे दोन लाख ९३ हजार ९९४ रुपये, तर इमारत क्रमांक ४२२ (२)चे एप्रिल ते जून २०२३ चे एक लाख ६५ हजार २६४ रुपये असे दोन्ही इमारतींचे मिळून चार लाख ५९ हजार २५८ रुपये थकीत भाडे मिळण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडे त्याचा पाठपुरावा सुरू होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Two junior assistants were arrested in bribe crime Nandurbar  news
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारी शिगेला! चोरट्यांनी पळवलं केंद्रीय मंत्र्यांच्या आईचे मंगळसूत्र

मात्र, लेखाधिकारी भास्कर रानोजी जेजूरकर हा बिल काढण्यासाठी अडवणूक करीत असल्याने पडताळणीच्या नावाखाली बिल प्रलंबित होते. पडताळणी करून प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी भास्कर जेजूरकर याने गुरुवारी (ता. १७) लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक सापळा अधिकारी स्वप्नील राजपूत आणि सहसापळा अधिकारी संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. १८) सापळा लावण्यात आला असता, संशयिताला १० हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Two junior assistants were arrested in bribe crime Nandurbar  news
Jalgaon Bribe Crime : चाळीसगाव ‘तहसील’मधील लिपिकास लाच घेताना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.