बांधकाम विभागातून हिशेबाची कागदपत्रे गायब; गैरव्यवहार लपविल्याचा संशय

PWD latest marathi news
PWD latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : मागील दोन वर्षात महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोट्यवधींची रस्ते तसेच स्थापत्य कामे झाली असताना अशा प्रकारचे अभिलेख बांधकाम पूर्व विभागातून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

यातून मोठा गैरव्यवहार दडपला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून या विषयावर कानावर हात ठेवण्यात आले आहे. (Accounting documents missing from construction department Suspicion of concealment of malpractices Nashik Latest Marathi News)

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून २०२०-२१ व २०२१- २२ या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकाची जवळपास ४० ते ४५ टक्के रक्कम खर्च करण्यात आली. यात सुमारे साडेसहाशे कोटी रुपये फक्त रस्त्यांवर खर्च करण्यात आले.

विशेष म्हणजे पूर्व विभागात सर्वाधिक खर्च झाला. कोट्यवधी रुपये खर्च करूनही, पावसामुळे रस्त्यांची धूळधाण झाली. रस्त्यांची दुरवस्था समोर आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एकीकडे रस्त्यांवरून नागरिकांचा रोष वाढत असताना आता नव्याने डागडुजीसाठीदेखील करोडो रुपये खर्च केले जात आहे.

नागरिकांचा कररूपी निधी पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेच्या पूर्व विभागाच्या बांधकाम विभागाकडे माहिती अधिकाऱ्यांवर विस्तृत स्वरूपात माहिती मागविण्यात आली.

बांधकाम विभागाकडून झालेल्या खर्चाचा ताळेबंद लेखी स्वरूपात द्यावा, अशी नोंद होती. परंतु, बांधकामाच्या पूर्व विभागाकडून विलंबाने उत्तर देताना अभिलेख उपलब्ध नसल्याचे स्पष्ट उत्तर देण्यात आले. बांधकाम विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे गैरव्यवहार दडवीला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दोन वर्षात डांबरावर झालेला खर्च, प्रभागनिहाय रस्त्यांची लांबी, खडीकरण झालेले रस्ते किती या संदर्भात माहिती मागविण्यात आली होती. मात्र, बांधकाम विभागाने अभिलेख उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले. यातून गैरव्यवहार लपविला जात असल्याचे बोलले जात आहे.

PWD latest marathi news
‘सिव्हिल’मध्ये केसपेपर वितरण करतोय खासगी व्यक्ती

बडे मासे अडचणीत

वास्तविक संगणकीकरणामुळे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असताना माहिती का लपविली जाते, यावरून संशय निर्माण झाला आहे. माहिती समोर आल्यास कनिष्ठ अभियंत्यापासून कार्यकारी अभियंते व लोकप्रतिनिधीपर्यंत अनेक बडे मासे अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याने यातून माहिती लपविली जात असल्याचे बोलले जात आहे.

प्रत्यक्षात झालेली कामे व काढण्यात आलेली देयके यामध्ये तफावत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने माहिती मागविल्याने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

"विभागस्तरावरील माहिती उपअभियंते देतात. अभिलेख उपलब्ध नसल्याचे उत्तर देणे चुकीचे आहे. या संदर्भात माहिती घेऊन पुढील कारवाई करू."

- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, नाशिक महापालिका.

PWD latest marathi news
Nashik : यंदा ‘MVP’ सभासद देणार 21 मते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()