Crime Update : चरस बाळगल्याप्रकरणी आरोपींना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

nashik crime latest news
nashik crime latest newsesakal
Updated on

नाशिक : अवैधरीत्या चरस (Charas) नामक अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश वर्धन देसाई यांनी दहा वर्ष सक्तमजुरी (Hard Labour) आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

निखिल ऊर्फ सनी सुरेश गायकवाड, इलियाज महमूद शेख, चंद्रशेखर सुखदेव शेरेकर असे शिक्षा झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. (accused sentenced to 10 years of hard labor case of possession of hashish nashik crime Latest Marathi News)

६ डिसेंबर २०१२ मध्यरात्री रासबिहारी ते मेरी लिंक रोडवर रात्री एक ते दीडच्या सुमाराला रमाकांत चुनिलाल बडगुजर यांच्या बंगल्याजवळ पजेरो गाडीने (एमएच ०४, बीएच ८००८) दुसऱ्या वाहनाला (केएम २० एम-१७३७) टोचन करून घेऊन जात होते.

सदर गाडीमधून १३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ६ किलो ९०० ग्रॅम चरस हा बेकायदेशीररीत्या बाळगून विक्री करण्याच्या हेतूने शहरात घेऊन येत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पंचवटी पोलीसांना मिळाली होती.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरिक्षक बाजीराव महाजन यांनी तत्कालीन उपायुक्त साहेबराव पाटील व सहायक आयुक्त गणेश शिंदे यांची मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा रचला. त्यानंतर सदर चारचाकी ही याठिकाणी येताच थांबवून तपासणी केली असता, गाडीमध्ये चरस नामक अमली पदार्थ मिळून आला होता.

nashik crime latest news
अज्ञात माथेफिरूने चक्क शेतातील कपाशी उपटून फेकली!; कठोर कारवाईची मागणी

सदर गुन्ह्याचा सखोल तपास झाल्यानंतर संशतियांविरुद्ध २०१३ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. १५ जुलैला या खटल्याची जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश वर्धन देसाई यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

सरकारी पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा शाबीत होण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा चरस असल्याबाबतचा पुरावा सादर करण्यात आला.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वर्धन देसाई यांच्यासमोर सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ऐकून तिन्ही आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात पोलिस निरिक्षक महाजन, संजय सानप, अमोल रिकामे, संजय साठे, रंजन बेंडाळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.विशेष सरकारी वकील डॉ. सुधीर कोतवाल यांनी सरकारपक्षातर्फे कामकाज पाहिले.

nashik crime latest news
Nashik : सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा खुन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.