नाशिक : महिंद्रा कंपनीने विस्तारीकरणाचा निर्णय घेतलेला असताना आता जिल्ह्यात पाच ठिकाणी नव्या औद्योगिक वसाहती (Industrial Estates) उभारण्यासाठी अडीच हजार एकर जमीन संपादित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (acquire 2 and half thousand acres of land for setting up new industrial estates at 5 places in district nashik news)
यात मापारवाडी (ता.सिन्नर), जांबुटके (ता. दिंडोरी), राजूरबहुला (ता. नाशिक) घोटीमधील आडवण आणि मनमाड (ता.नांदगाव) येथे हे भूसंपादन केले जाणार आहे.
नवीन उद्योगांविषयी सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. उपलब्ध प्रकल्प अधिक विस्तारित करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, शहरात नवीन उद्योगांना जागा शिल्लक नाही, त्यासाठी जिल्ह्यातील पाच ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, शेतकरीवर्गाशी चर्चा केली जात आहे.
राजूरबहुला हे उद्योगांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एमआयडीसीने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे ३३७ हेक्टरवर औद्योगिक वसाहत विकसित करण्याचे नियोजन केले होते.
अजूनही या वसाहतीत उद्योग येण्याचे प्रमाण सुरूच आहेत. औद्योगिक वसाहतीच्या नव्या धोरणामुळे जिल्ह्यात मोठमोठ्या ग्रुपचे उद्योग येण्याची शक्यता आहे. सध्या बहुतांश उद्योगांकडून भूखंडासाठी एमआयडीसीकडे विचारणा केली जात असल्याची माहितीही समोर येत आहे.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात
जागेची वाढती मागणी लक्षात घेता, नव्या औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीकडून नियोजन सुरू आहे. त्यात सिन्नरच्या मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथे आणि मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या राजूरबहुला परिसरात भूसंपादन केले जाणार आहे. मापारवाडी आणि जांबूटके येथे पहिल्या टप्प्यात भूसंपादन होऊ शकेल, तर राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात असेल.
रिलायन्सची एंट्री फायदेशीर
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीत रिलायन्स ग्रुपचा रिलायन्स लाइफ सायन्सेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आल्याने, नाशिक उद्योग जगताला त्याचा मोठा फायदा होत आहे. या उद्योगाकडून जिल्ह्यात तब्बल २१०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेदेखील या ठिकाणी ३५० कोटींची गुंतवणूक केली. या दोन मोठ्या उद्योगांमुळे इतरही उद्योग नाशिककडे आकर्षित होत आहेत.
असे करणार भूसंपादन
जांबूटके, दिंडोरी - ३१.५१ हेक्टर
मापारवाडी, सिन्नर - २३०.६७ हेक्टर
राजूरबहुला, नाशिक - १४४.४३ हेक्टर
घोटी (आडवण) - २६२.९७ हेक्टर
मनमाड - २६८.८७ हेक्टर
एकूण - ९३८.४५ हेक्टर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.