Nashik News : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अकरा ग्रामसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
दोन ग्रामसेवकांना त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे. तसेच तीन ग्रामसेवकांबाबत फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Action against 11 gram sevak 3 dismissed 8 disciplinary action taken Nashik News)
हेमराज गावित (निळगव्हाण, ता. मालेगाव), सतीश बुधाजी मोरे (कौळाणे, ता. मालेगाव) व आतिश अभिमन शेवाळे हे कंत्राटी ग्रामसेवक बोराळे येथे कार्यरत असताना लाचेची मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
नीलेशसिंग गोविंदसिंग चव्हाण (वासाळी, ता. इगतपुरी) व सुभाष हरी गायकवाड (टाकेहर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांना मूळ वेतनावर आणणे, जयदीप उत्तम ठाकरे (दुगाव, ता. चांदवड) यांची तीन वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करणे, परशराम रायाजी फडवळ (चिचोंडी, ता. येवला) यांच्यावर कपात करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
शशिकांत जावजी बेडसे (वडगाव पंगू, ता. सिन्नर) यांची तीन वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करणे, माधव बुधाजी सूर्यवंशी (कुरुंगवाडी, ता. इगतपुरी) यांची समयश्रेणीतील निम्नस्तरावर आणणे, देवेंद्र सुदामराव सोनवणे (पळासदरे, ता. मालेगाव) यांची तीन वार्षिक वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करणे,
नरेंद्र सखाराम शिरसाठ हे (म्हाळसाकोरे, ता. निफाड) त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करणे, विजय गोपाळ अहिरे (टाकेहर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) व उल्हास बसवराज कोळी (वरसविहीर, ता. त्र्यंबकेश्वर) यांचा खुलासा मान्य करून त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अमोल गोविंद धात्रक (मळगाव, ता. नांदगाव) यांच्या चौकशीचे सुरेश छगन पवार (उम्रद, ता. पेठ) यांचाही चौकशीचे अहवाल मागविण्यात आले आहेत. ज्ञानोबा बाबूराव रणेर (सोनारी शिवडे, ता. सिन्नर) यांच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले आहेत.
यानुसार जून २०२३ या महिन्यात विभागीय चौकशीच्या एकूण १६ प्रकरणांवर कारवाई करून त्यात ११ ग्रामसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
यात दोन ग्रामसेवकांना दोषमुक्त करण्यात आले. तीन ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.