SSC-HSC Exam 2024 : अडवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई; परीक्षा फॉर्म न भरणे, हॉलतिकीट न देण्याच्या तक्रारी

दहावी-बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना काही शाळांनी काही विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरलेले नाहीत. हॉलतिकीटही उपलब्ध झाले आहेत.
SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam 2024 esakal
Updated on

SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना काही शाळांनी काही विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरलेले नाहीत. हॉलतिकीटही उपलब्ध झाले आहेत.

विद्यार्थी अभ्यासात गुंतलेले असून, काही शाळांकडून थकीत विविध शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. (Action against disruptive school Complaints of non filing of exam form non issue of hall ticket ssc hsc exam nashik news)

शुल्क न भरल्यास थेट विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट अडविले जात आहे. आता शिक्षणाधिकाऱ्यांनीच याची गंभीर दखल घेत अशा संस्था अन् शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

परीक्षेचे फॉर्म न भरल्यास, हॉलतिकीट अडविल्यास किंवा इतर कुठल्याही कारणाने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास शाळा अन् संस्थाच जबाबदार राहतील, असा इशाराच श्री. पाटील यांनी दिला आहे. याबाबत शाळांना पत्र पाठविण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे बारावीची परीक्षा फेब्रुवारीपासून, तर दहावीची मार्चपासून सुरू होणार आहे.

SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam : खासगी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यातील काही स्वयंअर्थसहाय्यित शाळा (सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड ) खासगी विना अनुदानित, कायम शुल्क भरू शकले नव्हते अशा विद्यार्थींकडूनही आता परीक्षेचे फॉर्म भरू दिले नाहीत.

काही विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉलतिकीट अडवून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. शुल्कवसुलीचा काही शाळांनी सपाटा लावला आहे. याबाबत नाशिक पॅरेंट असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

''शाळा शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत नाही. सातत्याने उल्लंघन करत असताना देखील दर वर्षी विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म न भरणे, हॉलतिकीट अडविणे या कारणांमुळे नुकसान झाल्यास नाशिक शिक्षण विभाग सर्वस्वी जबाबदार राहील.''- नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंट असोसिएशन

SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam 2024 : परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थितीची अट शिथिल; बोर्डाचे शाळांना आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.