Nashik News : राजकीय संरक्षण व प्रशासनाची दिरंगाई व ग्रामपालिकेची उदासीनता यामुळे विविध ठिकाणी तक्रारी तक्रारदार यांनी केल्यानंतर अखेर प्रशासनाने याबाबत कार्यवाहीचे पाऊल उचलले असून,
दिंडोरीच्या गटविकास अधिकारी यांनी वणीतील मुरमुरा कारखान्याविरोधात शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांच्या तक्रारीची दखल घेत वणी ग्रामपालिकेला कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. (Action against Murmura factory in Vani Complaints of farmers traders and villagers Nashik News)
गणेश लुंकड व इतर ११, अशा एकूण ११ त्रस्त व्यापारी, शेतकरी यांनी वणी-सापुतारा रस्त्यावरील गट क्रमांक ५१० यात सुरू असलेल्या मुरमुरा कारखान्याबाबत ग्रामपालिका कसबे वणी, पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार दिंडोरी, प्रांत अधिकारी दिंडोरी, जिल्हाधिकारी नाशिक, गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडे एप्रिल २०२३ मधे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या.
मुरमुरा तयार करण्याच्या प्रक्रियेतील दूषित पाणी मोकळे सोडल्याने हे पाणी विहिरीत व कूपनलिकेत उतरते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच दूषित पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सदर कारखान्यातून येणारा धूर, रेतीचे कण यामुळे श्वासोश्वास घेण्यास त्रास होतो. कांदा व्यावसायिक, मजूर, शेतकरी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारखाना चालविण्यासाठी अधिकृत परवानगीची तपासणी करून चौकशी करण्याची लेखी तक्रार करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने दिंडोरी पंचायत समीतीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी वणी ग्रामपालिका सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणेबाबत लेखी आदेश दिले आहेत.
दरम्यान, एप्रिल २०२३ पासून प्रशासनाचे उंबरठे झिजविणारे तक्रारदार न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, राजकीय हस्तक्षेप व प्रशासनाची उदासीनता यामुळे मुरमुरा कारखान्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा वणी परिसरात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.