Nashik News : ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई; एमजी रोडवर अर्ध्यावर अनधिकृत पार्किंग

The youth stopped at the spot as they saw that action was being taken against those who violated the traffic rules in the city.
The youth stopped at the spot as they saw that action was being taken against those who violated the traffic rules in the city.esakal
Updated on

नाशिक : शहर वाहतूक पोलिस शाखेकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जात असताना बेशिस्त वाहनचालकांची कमतरता नाही. स्मार्ट रोडवर ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर सदर कारवाई पाहून अनेकांनी मागच्या मागेच वाहने वळवून पळ काढतानाचे चित्र पाहावयास मिळाले.

तसेच, नेहमीच वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडलेल्या एमजी रोडवर अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीसाठी अरुंद रस्ता होत आहे. या ठिकाणीही वाहतूक शाखेकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होते आहे. (Action against triple seat bike riders Unauthorized parking halfway on MG Road Nashik News)

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध शहरात ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारला जातो. त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडवर मंगळवारी (ता. ३१) वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला होता.

सीबीएस सिग्नलवर कारवाईसाठी थांबलेल्या वाहतूक पोलिसांना टाळून ट्रीपल सीट दुचाकीस्वार मेहेर सिग्नलच्या दिशेने वेगात गेला. चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसानेही त्यांचा पाठलाग करून रोखले आणि दंडात्मक कारवाई केली.

सदरची कारवाई सुरू असताना पाहून ट्रिपल सीट व विना हेल्मेट दुचाकीस्वारांनी मागच्या मागेच वाहने वळून पळ काढतानाचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, एमजी रोडवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांची पार्किंग केली जाते.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

The youth stopped at the spot as they saw that action was being taken against those who violated the traffic rules in the city.
Nashik News : महाराजस्व अभियानातून महसूलची प्रतिमा उजळणार!

यापूर्वी या ठिकाणी पार्किंगसाठी वाहतूक शाखेने पिवळे पट्टे आखून दिले होते. हे पट्टे आता पुसट झाले आहेत. तर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केली जाते. या पार्किंगसह फळ विक्रेते व हॉकर्सच्या हातगाड्या लागलेल्या असतात.

त्यामुळे रस्ता चारपदरी असतानाही अनधिकृत पार्किंग व हॉकर्सच्या गाड्यांनी रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होऊन कोंडीची समस्या निर्माण होते. मात्र याकडे वाहतूक पोलिस शाखेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांसह त्रस्त वाहनचालकांकडून होते आहे.

The youth stopped at the spot as they saw that action was being taken against those who violated the traffic rules in the city.
Nashik News : "बदल घडतोय बदल दिसतोय"आमदार कांदेकडून कामांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.