NMC News : अनधिकृत 503 धार्मिक स्थळांवरील कारवाई अपूर्ण! महापालिकेचा शासनाला अहवाल सादर

शहरात ९०८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्यापैकी ५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई अपूर्ण आहे.
Nashik NMC News
Nashik NMC Newsesakal
Updated on

नाशिक : शहरात ९०८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्यापैकी ५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई अपूर्ण आहे.

यासंदर्भात महापालिकेने शासनाला अहवाल सादर केला असून, यातून ही माहिती समोर आली आहे. प्रलंबित धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी शासनाकडून सूचना आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. (Action on unauthorized 503 religious places incomplete Submitting report of NMC to Government nashik news)

सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये एका निकालासंदर्भात आदेश देताना राज्य शासनाने २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवावी, अशा सूचना दिल्या. त्याअनुषंगाने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या होत्या.

रस्त्यात, चौकात तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे धार्मिक स्थळ हटविण्याचे सूचना होत्या. महापालिकेने धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी केली. त्यात नाशिक शहरांमध्ये ९०८ धार्मिक स्थळ अनधिकृत आढळले.

संपूर्ण राज्यांमध्ये ११,९९६ अनधिकृत धार्मिक स्थळ असल्याची माहिती समोर आली. १, ७४५ अनधिकृत स्थळे एकट्या सोलापूर शहरात आढळली.

त्याखालोखाल अमरावती शहरात १, ३५२, नागपूर शहरात एक हजार २०५, पुणे शहरात १००३ तर ठाणे शहरांमध्ये ७१४ व अकोला शहरामध्ये ७११ धार्मिक स्थळ अनधिकृत आढळले.

अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यासाठी शासनाने निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखून दिला. त्यानुसार २००९ पूर्वीचे ४,६६९ धार्मिक स्थळ नियमित करण्यात आले. ८९४ अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यात आले.

Nashik NMC News
NMC News : जाहिरात फलक घोटाळ्याची व्याप्ती येणार समोर! महापालिकेचा लाखोंचा महसुल बुडाला

तर ८९ धार्मिक स्थळांचे स्थलांतर करण्यात आले. नोव्हेंबर २०१८ मध्ये मोहीम थांबविली. आता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळांवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

त्याअनुषंगाने महापालिकेने शासनाला अहवाल सादर करण्यात आला.

अनधिकृत धार्मिक स्थळांची स्थिती

- २००९ पूर्वीची शहरात अनधिकृत धार्मिक स्थळ- ९०८.

- नियमित करण्यात आलेली धार्मिक स्थळ- २४९

- निष्काषित केलेली अनधिकृत धार्मिक स्थळ- १५६

- कारवाई प्रलंबित असलेली धार्मिक स्थळ- ५०३

Nashik NMC News
NMC News : महापालिकेच्या मोठ्या कंत्राटदारांवर निशाणा; आयकर विभागाकडून पुन्हा धाडसत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.