नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची तूट येत असल्याने ती तूट भरून काढण्याबरोबरच अनधिकृत कामकाजाला आळा घालण्याच्या दृष्टीने अवैध बांधकामे, वापरातील बदल, अनधिकृत नळजोडणी, मिळकतींचा अवैधपणे वापर या बाबींची तपासणी महापालिकेकडून केली जाणार आहे.
त्यासाठी सहा विभागात तपासणी ३१ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनापासून चार दिवस मोहीम सुरू राहणार आहे. आयुक्तांच्या या ॲक्शन प्लॅनमुळे शहरात अनधिकृत कामकाजामध्ये करेक्शन करण्याचा भाग मानला जात आहे. (Action Plan Against Unauthorized Activities 31 teams of NMC will inspect properties Nashik News)
२०२२ व २३ च्या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेने जवळपास १६०० कोटी रुपयांचे उत्पन्न ग्राह्य धरले. मात्र, वर्षाअखेर होत असताना जमा व खर्चाचा ताळेबंद मांडला असता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साडेचारशे कोटी रुपयांची उत्पन्नात तूट दिसून आली. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटीचे अनुदान नियमित मिळाले.
मात्र, घर व पाणीपट्टी तसेच नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारा विकास शुल्क व विविध कराच्या उत्पन्नाची आकडेवारी लक्षात घेता साडेचारशे कोटींची तूट आहे. ‘बीओटी’वर मिळकती विकसित करून त्यातून चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे नियोजन होते. मात्र, ती योजनाच गुंडाळण्यात आली.
तर, नगररचना विभागाकडून जवळपास २५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. त्यातील जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. पाणीपट्टीतून ७५ कोटींपैकी अवघे ३५ कोटी रुपये प्राप्त झाले.
तर, घरपट्टीतून दीडशे कोटी रुपयांपैकी ७५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना उत्पन्न वाढविण्याबरोबरच उत्पन्नातील तूट भरून काढून विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आता शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या बाबींची होणार तपासणी
अवैध बांधकाम, अनधिकृत वापरात बदल, अनधिकृत नळ जोडणी, महापालिकेच्या मिळकतींचा किंवा जागेचा अनधिकृतपणे वापर, टेरेसचा अनधिकृत वापर, लॉजिंग रूमची अनधिकृत वाढविलेली संख्या, हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष मान्यतेपेक्षा अधिक बेडचा वापर या बाबींची तपासणी पथकांकडून होणार आहे.
यांचा आहे पथकात समावेश
- सिडको विभागात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांची पालक अधिकारी म्हणून पथकात नियुक्ती केली आहे. नाशिक रोड विभागात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम पालक अधिकारी असतील.
पश्चिम विभागात कार्यकारी अभियंता नितीन पाटील, तर पूर्व विभागात कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे तसेच सातपूर विभागात सचिन जाधव, तर पंचवटी विभागात कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात २५ तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
असे आहेत तपासणीचे नियम
- नियुक्त करण्यात आलेले अधिकारी वार्डनिहाय काम करतील.
- निवासी वापराऐवजी मालमत्तेमध्ये अनधिकृत बदल.
- सामासिक अंतर व पार्किंगमधील अवैध बांधकाम.
- पोटमाळा व तळघराचा सुरू असलेला वापर.
- अनधिकृत नळजोडणीचे आकारमान नियमित मीटर व अनधिकृत नळजोडणी.
- इमारतीच्या टेरेसवरील अनधिकृत बांधकाम.
- अनधिकृत होर्डिंग व होर्डिंगचा आकार.
- हॉटेल लॉजिंगमधील खोल्यांची संख्या व प्रत्यक्ष वापरात असलेल्या खोल्या.
- रुग्णालयातील मंजूर बेडची संख्या व प्रत्यक्ष वापरत असलेले बेड्स.
- महापालिकेच्या मालकीच्या अमेरिकेतील व खोल्या जागांचा अनधिकृत वापर.
- मिळकती भाडेतत्त्वावर दिल्या का दिल्या असल्यास कर आकारणीचा प्रकार.
२६ ते २९ जानेवारी चा कालावधी
तपासणी मोहीम २६ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ या दरम्यान होणार आहे. त्यापूर्वी मंगळवारी (ता. २४) सकाळी साडे अकरा वाजता आयुक्त डॉ. पुलकुंडवार नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक होईल.
"महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे. मात्र उत्पन्नात वाढ करताना अनधिकृतपणे होत असलेल्या कामकाजावर आळा घालणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी शोध मोहीम राबविली जाणार आहे." - डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.