Nashik Kumbh Mela 2023: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन! NMC आयुक्तांच्या सर्व विभागांनी विशेष सूचना

Dr. Ashok Karanjkar
Dr. Ashok Karanjkaresakal
Updated on

Nashik Kumbh Mela 2023 : महापालिकेचे प्रशासकीय कामकाज समजून घेतल्यानंतर नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामाचे नियोजन केले असून, महापालिकेच्या सर्व विभागांनी विशेष सूचना दिल्याने आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील सिंहस्थात केलेल्या पूर्वतयारी तसेच मोठ्या कामांचा सविस्तर अहवाल मागविण्यात आल्याने एकीकडे प्रशासकीय कामकाजाची घडी बसविताना दुसरीकडे नाशिकच्या विकासाला हातभार लावणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडेही लक्ष केंद्रित केले आहे. (Action Plan for Nashik Simhastha Kumbh Mela 2023 Special instructions by all departments of NMC Commissioner)

विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज व पद्धती समजून घेतली. अतिरिक्त आयुक्त सेवा व शहर यांच्या कामांचे अधिकार निश्चित करताना प्रत्यक्षात कामाला सुरवात केल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने ते खड्डे बुजविण्याबरोबरच रोजच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

साथरोगाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने औषध व धूर फवारणी तातडीने करून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागांना केल्या. काझी गढी वरील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Ashok Karanjkar
NMC Tax Recovery: शंभर टक्के करवसुलीसाठी डिसेंबर अखेरची डेडलाइन! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ॲक्शन प्लॅन

- पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तातडीने खड्डे बुजविण्याची कारवाई करावी.

- पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना कराव्या.

- काझी गढी येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.

- धोकादायक इमारती उतराव्यात.

- साथ रोगांच्या प्रादुर्भाव होवू नये यासाठी उपाययोजना.

- आरोग्यवर्धिनी केंद्रे वेळेत उभारावी.

- घंटागाडी तक्रार आल्यास कारवाई.

- स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा.

- पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने कार्यवाही.

- कर संकलन उद्दिष्ट पूर्ण करावे.

- शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवावे.

- उद्यान विभागाने वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे.

- उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण.

- दिव्यांग, महिला व समाजकल्याण विभागासाठी निधी पूर्ण खर्च करावा.

- दूषित पाणी आल्यास तातडीने कार्यवाही करावी.

Dr. Ashok Karanjkar
NMC School : महापालिकेच्या शाळांमध्ये 845 विद्यार्थ्यांची वाढ! झोपडपट्टी भागात जाऊन सर्वेक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()