नाशिक : थकबाकीदार यांच्याकडून कर्ज वसुली करण्याच्या उद्देशाने सहकार विभाग आयुक्त यांच्याकडून कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार नाशिक विभागातील सर्व सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCC Bank) यांनी कर्ज वसुलीच्या अनुषंगाने थकबाकी निश्चितीची कार्यवाही आणि त्यानंतरची वसुली प्रक्रिया नियोजन करत टप्प्या टप्प्याने करत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशान्वये विभागीय उपनिबंधक यांनी देखील हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. (Action Program of Cooperative Department Announced nashik Latest Marathi News)
कर्जवसुली ही सहकारी विभागाचा अविभाज्य घटक आहे. कर्जवसुली करणे ही त्या संस्थांची जबाबदारी असून यावर संस्थेची प्रगती अवलंबून असते. यानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात कर्जपरतफेडीसाठी असलेली मुदत ही जून महिन्याअखेर संपुष्टात येत असते.
त्यामुळे आता सहकार विभागाकडून कर्जवसुलीसाठी जिल्हा बँक आणि सहकारी विकास संस्था यांना थकबाकी निश्चित करत कर्जवसुली करण्याच्या उद्देशाने कृती कार्यक्रम आखून दिला आहे. त्या कार्यक्रमानुसार त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील विभागीय उपनिबंधक यांना केल्या आहेत.
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास संस्थेचे संचालक मंडळ, गटसचिव आणि बँक निरीक्षक यांनी या कृती कार्यक्रमाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त अरुण कवडे यांनी दिले आहेत.
असा आहे कृती कार्यक्रम
जिल्हा बँक आणि सेवा सोसायटी यांनी थकबाकी व कर्जदार यांची निश्चिती करावी. त्यानंतर ऑक्टोबर महिन्या अखेरपर्यंत कर्जवसुलीसाठी विकास संस्था, संचालक यांनी थकीत कर्जदार यांची यादी संस्था आणि ग्रामपंचायती व चावडी वरच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध कराव्यात.
यानंतर थकबाकीदार यांची गावामध्ये दवंडी देत सर्वांना माहिती करून द्यावी. यासह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १०० मोठ्या थकबाकीदार यांची स्वतंत्र यादी तयार ती मुख्य बँक, शाखा, बाजार समिती यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यासह स्थानिक वर्तमानपत्रामधून याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.