नाशिक : दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या 175 चालकांवर कारवाई

Drink-driving
Drink-drivingesakal
Updated on

नाशिक : विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर (Special Inspector General of Police Dr. B.G. Shekhar) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या वाहन तपासणी मोहिमेत (Vehicle Inspection Campaign) दारू पिवून वाहन चालविणाऱ्या तब्बल १७५ वाहनांवर पोलिस पथकांकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी परिक्षेत्रात एकाच वेळी केलेल्या मोहिमेत साडेतीन हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीमध्ये जळगाव, धुळे आणि नंदूरबार मध्ये सर्वाधिक वाहनचालक हे दारू पिऊन वाहन चालवीत असल्याचे समोर आले आहे. (Action taken against 175 drunk drivers during Vehicle inspection campaign Nashik News)

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी रात्री आठ ते अकरा या कालावधीमध्ये परिक्षेत्रातील नाशिक, धुळे, नगर, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये १४१ पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये येत असलेल्या ठिकाणी १५० ठिकाणांवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करण्यात आली होती. पोलिस पथकांकडून करण्यात आलेल्या या तपासणींमध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये तीन तासाच्या कालावधीमध्ये सुमारे ३ हजार ६७२ वाहने तपासण्यात आली. यामध्ये १७५ वाहनचालक हे दारू पिवून वाहन चालवीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.

Drink-driving
शेतीच्या वादात काका-पुतण्यामध्ये हाणामारी; अभियंता पुतण्याचा मृत्यू

यामध्ये सर्वाधिक वाहनचालक हे जळगाव (४९) मध्ये मिळून आले त्याखालोखाल नंदूरबार (४४) आणि धुळे (४३) मध्ये सर्वाधिक मद्यपी चालक मिळून आले. नाशिक (८) आणि (२८) जिल्ह्यातही मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस दलातील ११३ अधिकारी व ५८७ कर्मचारी ह्यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली.

Drink-driving
Nashik : शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट; तरुणास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.