Fake Doctor Crime: जातेगावला बनावट डॉक्टरवर कारवाई; पदवी नसताना करीत होता उपचार, साहित्य जप्त

Fake Doctor arrested
Fake Doctor arrestedesakal
Updated on

Fake Doctor Crime : वैद्यकीय क्षेत्रात प्रस्थ निर्माण करीत जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तालुक्यातील जातेगाव येथील बनावट बंगाली डॉक्टर आलोककुमार धीरेंद्रनाथ बिस्वास (सिंग) याच्याविरोधात शनिवारी (ता. ९) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. (Action taken against fake doctors in Talegaon doing treatment without degree materials seized nasnik crime)

शहरात वैद्यकीय सेवेचा अधिकृत असा परवाना नसलेल्या राजू विसपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर ही दुसरी मोठी कारवाई आहे.

जातेगाव येथे १५ वर्षांहून अधिक काळापासून बस्तान मांडून बसलेल्या बिस्वास याच्याकडे करण्यात आलेल्या कारवाईत ९० हून अधिक ॲलोपॅथिक औषधांचा व ॲलोपॅथिक शेड्युल H-1 चा साठा मिळून आला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बिस्वास याच्याकडे बीईएमएस इलेक्ट्रोपथी शाखेतील पदवी असूनही त्याच्याकडे आवश्यक असणारी अॅलोपथीची पदवी तसेच शासनाचा कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना, आवश्यक ते शिक्षण नसताना तो आजारी रुग्णांवर बनावट उपचार करीत होता.

डॉ. जगताप यांनी पोलिसांसोबत टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. त्याच्या दवाखान्यात सहा बेड, स्टेथोस्कोप, बी. पी. ऑपरेटर, सलाईन स्टँड, ड्रेसिंग मटेरियल, डॉक्टर व्हिजिट बॅग वगैरे साहित्य मिळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fake Doctor arrested
Crime: उपचाराच्या नावाखाली सराईताचा सिव्हिलमध्ये मुक्काम! गुन्हेगार व्यंकटेश मोरे बुधवारपासून जिल्हा रुग्णालयात

महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ व भारतीय दंड संहितेचे कलम ४२०, ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.

बनावट डॉक्टरांचे फुटले पेव

रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महावीर जाधव यांनी याप्रश्नी गेल्या महिन्यात तहसील कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. तसेच, ऑगस्टमध्ये मालेगाव रोडवरील खासगी जागेत प्रॅक्टिस करणाऱ्या राजू विसपुते नामक एका बनावट डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला होता.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट डॉक्टरांचे पेव फुटले असून, या प्रकाराकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Fake Doctor arrested
Nagpur Crime : दारूच्या नशेत आधारकाठीने केला जन्मदात्या पित्याचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.