Nashik News: होर्डिंगवर कारवाईचा बडगा; पिंपळगाव ग्रामपंचायतीचा निर्णय

Gram Panchayat staff confiscating hoardings obstructing traffic
Gram Panchayat staff confiscating hoardings obstructing trafficesakal
Updated on

Nashik News : वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील अशा पिंपळगाव शहरातील निफाड फाटा परिसर नेहमीच अनधिकृत होर्डिंगने वेढलेला असतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येऊन अपघात घडत असतात.

अपघाताला आमंत्रण देणाऱ्या व शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या होर्डिंगबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील होर्डिंग प्रशासनाने खाली उतरवत जप्तीच्या कारवाई केली आहे.

त्यामुळे काही प्रमाणात शहरातील मुख्य चौकांनी मोकळा श्‍वास घेतला असून, वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. (Action taken on hoardings Decision of Pimpalgaon Gram Panchayat Nashik News)

पिंपळगाव शहरातील निफाड फाटा, स्टेट बँक कॉर्नरसह वर्दळीच्या ठिकाणी विविध उत्पादने, वाढदिवस, शोकसंदेश यांचे फलक उभारले जातात. त्यासाठी ग्रामपंचायतीला कर भरणे तर सोडाच, साधी परवानगीही नसते.

विनाकर अनधिकृत होर्डिंग उभारून जाहिरातबाजी करता येत असल्याने फलकांचे हे पेव अधिकच फोफावत चालले होते. मुख्य बाजारपेठेमुळे शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते. शिवाय शेतीमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने येतात.

ही होर्डिंग वाहतुकीला स्पीड ब्रेकर ठरायचे. निफाड फाट्यावर तर समोर वाहने येते की नाही, याचा थांगपत्ता लागत नव्हता. याबाबत नागरिक व वाहनचालकांची ओरड होती. अनेकदा अपघात घडून नागरिक जखमीही झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gram Panchayat staff confiscating hoardings obstructing traffic
Mahavitaran: ‘महावितरण’तर्फे रोखीने बिल भरण्यासाठी कमाल मर्यादा! ऑगस्टपासून रोखीने एवढेच बिल भरता येणार!

वाहतुकीसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या होर्डिंगवर कारवाई करण्याचा निर्णय सरपंच भास्करराव बनकर यांनी घेतला. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धडक मोहीम राबवत वाहतुकीला अडथळा ठरणारे ५० हून अधिक होर्डिंग जप्त केले आहेत.

"अनधिकृत होर्डिंग वाहतुकीला अडथळा ठरत होते. ते जप्त करण्यात आले आहेत. शहराचे विद्रूपीकरणही होत होते. वाहतुकीला अडथळे ठरणारे होर्डिंग लावल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल." -भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

Gram Panchayat staff confiscating hoardings obstructing traffic
Nashik Crime: पंचवटीतील दाम्पत्याविरोधात खंडणीचा गुन्हा; नातलगास 10 टक्क्याने पैसे देत धमकावले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.