Nashik News: सिन्नर तालुक्यात पंधरा वर्षांपासून इंडियाबुल्सचा प्रकल्प विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झाला नसल्याने ताब्यात असलेली जमीन सरकारने ताब्यात घ्यावी, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना १५ ऐवजी नव्या नियमावलीप्रमाणे पंधरा टक्के विकसित जागा तातडीने द्यावी, इंडियाबुल्स औष्णिक विद्युत प्रकल्प शासनाने विकत घ्यावा, या प्रमुख मागण्या आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत अधिवेशनादरम्यान मांडल्या. (Action to replace indiabulls SEZ will be taken soon nashik news)
दरम्यान, इंडियाबुल्सला उत्तर देण्यासाठीची मुदत २ डिसेंबरला संपल्याने जागा घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने इंडियाबुल्सच्या जागेचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२००७ मध्ये सिन्नर येथे इंडियाबुल्सला विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यासाठी तीन हजार एकर जमीन देण्यात आली होती. या प्रकल्पात इंडियाबुल्स कंपनीची ८९ टक्के, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ११ टक्के भागीदारी होती. परंतु पंधरा वर्षांत एक औष्णिक विद्युत प्रकल्प सुरू करणे त्याला कुंपण घालणे व प्लॉटिंग करणे याव्यतिरिक्त काहीच काम झाले नाही.
जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा टक्के वाढीव विकसित जमीन देण्याची व मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथील औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची अट ठेवली होती. परंतु पंधरा-सोळा वर्षांत यापैकी एकही अटीची पूर्तता इंडिया बुल्सने केली नाही.
सरकारने इंडियाबुल्स कंपनीला महाराष्ट्र गव्हर्मेंट प्रीव्हिएशन कायदा १९५५ अन्वये जमीन परत देण्यासाठी नोटीस पाठविली आहे. परंतु या प्रकल्पात औद्योगिक विकास महामंडळाची ११ टक्के भागीदारी असल्याने अशी नोटीस लागू होणार नाही.
येथील शेतकरी पंधरा वर्षांपासून भूमिहीन आहेत. त्यामुळे त्यांना आता जमीन देताना पूर्वीच्या पंधरा टक्के विकसित तरतुदीऐवजी नव्याने केलेल्या २२ टक्के विकसित जमिनीची तरतूद लागू करण्याची मागणी आमदार तांबे यांनी करताना जमीन परत मिळण्याचा कालावधी सरकारने जाहीर करण्याचा आग्रह धरला.
सरकारतर्फे कॅव्हेट दाखल
इंडियाबुल्सकडून जागा ताब्यात घेण्याचे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देताना सरकारने इंडियाबुल्स कंपनीला नोटीस पाठवली. त्या विरोधात न्यायालयात जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. कंपनीला उत्तर देण्यासाठी २ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. त्यामुळे ही मुदत संपल्याने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.
"इंडियाबुल्स ‘एसईझेड’च्या जागेवर औष्णिक विद्युत प्रकल्प उभारला आहे. ‘महाजनको’ने प्रकल्प ताब्यात घेण्यासंदर्भात चाचणी करावी, असे झाल्यास नाशिक जिल्ह्यात दोन अद्ययावत औष्णिक विद्युत प्रकल्प ‘महाजनको’कडे येतील." - सत्यजित तांबे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.