रावळगावच्या एस. जे. शुगरची साखर सील; एफआरपी वसुलीसाठी कारवाई

sugar factory
sugar factoryGoogle
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : रावळगाव येथील एस. जे. शुगर साखर कारखान्याकडे २०२०-२१ मधील गळीत हंगामामधील एफआरपीपोटी Fair and remunerative price (FRP) १७ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये रक्कम थकीत आहेत. थकीत एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांच्या आदेशान्वये, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार येथील तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी एस. जे. शुगरची २३ कोटी ७१ लाख रुपयांची साखर, ३५ लाखांची कच्ची साखर, मोलॅसेस व बॅग असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज सील करून ताब्यात घेतला. (Action was taken against S J sugar factory at Rawalgaon for recovery of overdue FRP)

कारखान्याच्या गुदामाला सील

साखर कारखान्यांच्या ऊस नियंत्रण आदेशान्वये १९६६ च्या कलम ३ (३) मधील तरतुदीनुसार हंगामामधील गाळप केलेल्या उसाचे १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा करणे बंधनकारक असताना, एस. जे. शुगरने ऊस पुरवठादारांची रक्कम थकविली आहे. याबाबत साखर संचालनालयाने कारखान्याला नोटीस दिली होती. थकीत एफआरपीप्रमाणे १९ मेस सुनावणीही झाली होती. अखेर पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नाशिक येथील सहकारी संस्थांच्या विशेष लेखापरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. विशेष लेखापरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजपूत, मंडलाधिकारी दौलत गणोरे, तलाठी चंद्रकांत महाले यांनी रावळगावचे सरपंच महेश पवार, कारखान्याचे लेखापरीक्षक अभ्यंकर आदींच्या उपस्थितीत जप्ती करून कारखान्याच्या गुदामाला सील ठोकले.

या कारवाईत २३ कोटी ७१ लाख रुपयांची ७६ हजार ५१२ क्विंटल साखर, एक हजार ४०२ क्विंटल ३५ लाखांची कच्ची साखर, ७५ लाख ९९ हजार रुपयांचे ९४९ टन मोलॅसेस व सुमारे १२ हजार रुपयांच्या १० टन बॅगा, असा एकूण २४ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

sugar factory
कोरोनामुळे लांबला नाशिक मेट्रोचा प्रवास!

थकीत रक्कम मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

एस. जे. शुगरला २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी हजारो शेतकऱ्यांनी ऊस दिला. मात्र, त्यांना अद्याप उसाचे पेमेंट मिळालेले नाही. विविध पक्षांनी याप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांचा वाढता असंतोष व थकबाकी लक्षात घेता साखर आयुक्तांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला. साखर आयुक्तालयाने ही कारवाई केल्यानंतर जप्त ऐवजाचा लिलाव होऊ शकतो. यामुळे ऊसपुरवठा शेतकऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

(Action was taken against S J sugar factory at Rawalgaon for recovery of overdue FRP)

sugar factory
नाशिक शहरात १५१ घरे अतिधोकादायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.