दोषींवर कारवाई होणार...; जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

Action order latest marathi news
Action order latest marathi newsesakal
Updated on

लखमापुर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावातील जिल्हा परिषद शाळेविषयी येत असलेल्या तक्रारींची गंभीर दाखल घेऊन कोणाचीही पाठ राखण न करता दोषींवर कडक कारवाई केले जाईल असे प्रतिपादन जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी केले असून याविषयी सखोल चौकशी करून प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिंडोरी गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहे. (Action will be taken against culprits of ZP School complaints District Education Officers inquiry order Nashik Latest Marathi news)

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिक्षकांनी पटसंख्या वाढेल म्हणून प्रवेश नाकारल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांविषयी अनेक तक्रारी गटशिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाले आहेत. वारंवार समज देऊन देखील त्यांच्या मध्ये सुधारणा होत नसल्याच्या तक्रारी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या आहेत.

संबंधित मुख्याध्यापक संवर्ग -1 मध्ये येत असल्याने आपली बदली होऊच शकत नाही हा गह त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे ते मनमानी पद्धतीने कारभार करतात अशा तक्रारी त्यांच्याबाबत येत आहेत.

जानोरी शाळेत नऊ ते दहा वर्षापासून ते कार्यरत असताना शाळेची सुधारणा होऊ शकली नाही अथवा त्यांची बदली होत नाही याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.यामुळे मुख्याध्यापक अकार्यक्षम असल्याने संबंधित मुख्याध्यापकाचे तात्काळ इतरत्र बदली व्हावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

गटशिक्षणधिकार्‍यांनी तत्काळ शिक्षण विस्तार अधिकार्‍यांना शाळेवर पाठवून घटनेची माहिती घेत तक्रारदार व शालेय व्यवस्थापन समितीची लेखी घेतली. यावेळीही शालेय व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकांविषयी तक्रारी मांडून न्याय देण्याची मागणी केली.

तरी संबंधित विभागाने याविषयी त्वरीत दखल घेवून लवकरात लवकर समस्या कायमची निकामी काढण्यासाठी दोषींवर कार्यवाही, व्हावी, अशा मागणीने जोर धरला आहे. शिक्षण विभाग कोणता निर्णय घेणार याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Action order latest marathi news
Zarif Baba Murder Case : सुफी धर्मगुरूंचा मृतदेह मुंबईला

"जानोरी येथील मुख्याध्यापकांविषयी वारंवार तक्रारी गटशिक्षणाधिकार्‍यांकडे केलेले आहेत. मुख्याध्यापक म्हणून ते अकार्यक्षम असून त्यांची इतरत्र बदली होणे अपेक्षित आहे. प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीने याविषयी तक्रारी केल्या आहेत. येणार्‍या ग्रामसभेत याविषयी ठराव मांडून शालेय समिती व्यवस्थापन तसेच गावाच्या वतीने या मुख्याध्यापकांवर बदलीची कार्यवाही व्हावी याची मागणी आम्ही करणार असून वेळप्रसंगी शाळेच्या भवितव्यासाठी आंदोलनाची तयारी देखील आम्ही करू." -चिंतामण श्रीखंडे, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती

"जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेविषयी असलेल्या तक्रारींचे सखोल चौकशी करून तो प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित तालुक्याच्या गटशिक्षण अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत तो प्रस्ताव आल्यानंतर तो तो प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येईल. कोणाचेही पाठराखण न करता दोषींवर कारवाई करण्यात येईल."

-मच्छिंद्र कदम, जिल्हा शिक्षणधिकारी

Action order latest marathi news
प्रारुप मतदार याद्या हरकतींचा गोषवारा समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.