Nashik News: ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार! दिंडोरीच्या गटविकासाधिकारी नम्रता जगताप यांचा इशारा

 Court Order
Court Order esakal
Updated on

लखमापूर : वेळेच्या आधी शाळेला सुट्टी देणे अथवा शाळेवर निर्धारित वेळेच्या आधी शाळा सोडणे अथवा शाळेवर उशीरा पोचणे, तसेच शाळेतून वेळेअगोदर निघून जाणाऱ्या शिक्षकांचा मी स्वत: शोध घेणार असून, त्यासाठी तालुक्यातील शाळांवर अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहे व रजेवर असूनही रजा तक्ता न भरल्यास संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकासाधिकारी नम्रता जगताप यांनी दिला आहे. (Action will be taken against teachers Dindori Group Development Officer Namrata Jagtap warned Nashik News)

ठेपणपाडा (ता. दिंडोरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक तास अगोदर शाळेला सुट्टी दिली होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली होती.

ती तक्रार गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्यापर्यंत जाताच त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली असून, त्या स्वत: तालुक्यातील शाळांना भेटी देणार आहेत. या भेटीदरम्यान शिक्षकांची अनुपस्थितीचे कारण बघितले जाणार आहे.

त्याचबरोबर येण्या-जाण्याची वेळही शासनाने निर्धारीत केलेल्या वेळेनुसार आहे, की नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील शिक्षण पद्धतीला आलेली मरगळ झटकली जाणार आहे.

विशेषत: द्विशिक्षिकी शाळांमध्ये एकमेकांना सावरून घेण्यासाठी रजेचा फार्म्युला वापरण्यात येतो. रजेच्या दिवशी रजा तक्ता भरणे आवश्यक राहील.

अत्यावश्यक रजा घेतल्यास व त्याबाबत मुख्याध्यापकांपर्यंत रजेचा अर्ज पोचविला असल्यास मुख्याध्यापकांनी त्या अर्जावरून संबंधित शिक्षकांची रजा तक्त्यामध्ये भरणे अनिवार्य असेल.

रजेवर असलेल्या शिक्षकाची रजा तक्तामध्ये नोंद आढळून न आल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिला आहे.

 Court Order
NMC News: सौर दिव्यांसाठी 2 कोटीचा निधी! 2 जलतरण तलावांवर सौरऊर्जा पॅनल उभारणार

याचबरोबर शालेय अध्यापना वेळी मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात यावे, अशा मागणीने जोर धरला आहे. त्यावरही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दखल घ्यावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

मोबाईल वापरावर बंदी आणावी

मविप्र संस्थेतील शिक्षकांनी अध्यापन करताना अथवा वर्गांमध्ये मोबाईलचा वापर न करण्याबाबत सूचना नवनिर्वाचित संचालक प्रवीण जाधव यांनी दिली आहे. त्यानुसार मविप्रच्या सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी याची जबाबदारी घेत मोबाईल वापरावर बंदी आणली आहे.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेने देखील या उपक्रमाचा आदर्श घेणे अपेक्षित आहे. शालेय कामकाजावेळी मोबाईल वापरावर बंदी मुख्याध्यापकांकडून आणणे आवश्यक आहे. कारण शिक्षकांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक साहित्यापुरताच करावा.

शासनाच्या आदेशाप्रमाणे शालेय वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी वर्गात अध्यापन सुरू असतानाही मोबाईलचा सर्रासपणे वापर होत असतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.

 Court Order
NMC News: महापालिकेची अतिक्रमण कारवाई; अन् अतिक्रमण विभागाच्या हाती भोपळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()